Bigg Boss 17 Latest News : यंदाच्या ‘बिग बॉस १७’ने टेलिव्हिजन विश्वात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अंकिता लोखंडे – विकी जैन, ऐश्वर्या शर्मा – निल भट्ट, ईशा मालवीय – समर्थ जुरेल या जोड्यांची विशेष चर्चा रंगलेली आहे. ‘बिग बॉस’ सुरु झाल्यापासून ईशा मालवीय ही तिच्या वैयक्तिक नात्यामुळे चर्चेत आहे. कधी ती अभिषेक कुमारबरोबरच्या तिच्या नात्यामुळे वा त्यांच्या भूतकाळातील नातेसंबंधांमुळे चर्चेत असते तर कधी तिचा सध्याचा प्रियकर समर्थ जुरेलमुळे चर्चेत असते.
समर्थ जुरेल याने ‘बिग बॉस १७’मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री घेतली आहे. समर्थचा या शोमध्ये प्रवेश झाल्यापासून तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतो. समर्थ व ईशा यांच्या नात्याचीही बरीच चर्चा रंगली. ‘बिग बॉस’च्या घरात बरेचदा हे जोडपे जवळीक साधताना दिसले. समर्थ अनेकवेळा ईशाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताना दिसला आहे.
‘बिग बॉस’च्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये समर्थ व ईशा एकमेकांच्या जवळ आलेले पाहायला मिळाले. समर्थ अनेकदा ईशाच्या जवळ जात तिला किस करण्याचा प्रयत्न करताना दिसला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने तिच्या पोटावर व गालावर किस केली असून तो विचित्र कृत्य करताना समोर आला आहे. ईशा-समर्थ जवळीक साधतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकरी त्यांच्यावर भडकले आहेत.
Chintu galat show me aagaya hainpic.twitter.com/VXoD6MjYaB
— #BiggBoss_Tak???? (@BiggBoss_Tak) November 17, 2023
सोशल मीडियावर समर्थ-ईशाची क्लिप शेअर करताना एका यूजरने लिहिले आहे की, ‘चिंटू चुकीच्या शोमध्ये आला आहे’. यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत राग व्यक्त केला आहे. एकाने लिहिले आहे की, ‘यांना लस्ट स्टोरीजमध्ये पाठवा. त्यांनी ‘बिग बॉस’ला प्रेमाची धर्मशाळा बनवलं आहे”. तर एका युजरने लिहिलं आहे की, ‘हो, त्याला असं वाटत आहे की, इथे स्प्लिट्स व्हिला सुरू आहे”. अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी समर्थ ईशाच्या या कृतीवरून त्यांना ट्रोल केलं आहे.