Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’सध्या चर्चेत आला आहे. अगदी एका दिवसाच्या हाकेवर या शोचा अंतिम सोहळा पार पडणार आहे. अंकिता लोखंडे, मुन्नवर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा, अरुण माशेट्टी हे पाच स्पर्धक फिनाले पर्यंत पोहोचलेले पाहायला मिळत आहे. दरम्यान शोमधील स्पर्धकांना त्यांचे चाहते भरभरुन प्रेम देताना दिसत आहेत. तर सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना पाठिंबा दर्शवत आहेत. अशातच ‘बिग बॉस’च्या घरातील एक चर्चेत असलेल्या कपलनेही ‘बिग बॉस १७’मधील आवडत्या कलाकारांना सपोर्ट केलेला पाहायला मिळत आहे.
राहुल वैद्य व दिशा परमार या जोडीने ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर लग्न केलं. यानंतर आता दोघांनीही एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावरही हे कपल नेहमीच सक्रिय असत. दरम्यान राहुल व दिशेने यंदाचा ‘बिग बॉस’च्या घरातील विजेत्याचं नाव घोषित करत साऱ्यांचं लक्ष वेधून धरलं आहे. प्रवासादरम्यान विमानतळावर ही जोडी स्पॉट झाली होती. तेव्हा पापाराझीशी बोलत असताना त्यांना विचारण्यात आले की, “तुम्हाला काय वाटते ‘बिग बॉस’ची ट्रॉफी कोण जिंकेल?”, यावर उत्तर देत राहुल म्हणाला, “मला वाटते अंकिता लोखंडे किंवा मुन्नवर फारुकी यापैकी एक विजेता असू शकतो”.
यानंतर नुकत्याच आई झालेल्या दिशा परमारने देखील ‘बिग बॉस १७’ च्या विजेत्याबद्दल तिचे मत शेअर केले. दिशा म्हणाली, “मला असे वाटते अंकिता”. दिशा व्यतिरिक्त सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी अंकिताला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अंकिता ट्रॉफी जिंकेल अशी आशा सर्वांनी व्यक्त केली आहे. अंकिताला पाठिंबा दर्शवत अनेक कलाकार तिच्या समर्थनात सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करताना दिसत आहेत.
‘बिग बॉस १७’ चा ग्रँड फिनाले रविवार दिनांक २८ जानेवारीला होणार आहे. त्यामुळे यंदाच्या ट्रॉफीवर कोणता स्पर्धक नाव कोरणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. फिनालेच्या दिवशी शोमधून बाहेर पडलेले स्पर्धक प्रेक्षकांसमोर परफॉर्म करताना दिसणार आहेत.