Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ ची लवकरच सांगता होणार आहे. एका दिवसावर या शोचा फिनाले आला आहे. ‘बिग बॉस’ १७चा विजेता नेमकं कोण ठरणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. अलीकडेच रोहित शेट्टीने सलमान खानच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने घरातील सदस्यांना कठीण प्रश्न विचारत भंडावून सोडलं आहे. यावेळी रोहित शेट्टीनेही अंकिता लोखंडेला तिच्या गेम प्लॅनबद्दल प्रश्न केला. दरम्यान अंकितानेही अगदी धीटपणे त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली.
रोहित शेट्टीने ‘बिग बॉस १७’ च्या घरात प्रवेश करताच, त्याने अंकिता लोखंडेला तिच्या खेळाबद्दल प्रश्न केला. रोहित शेट्टी म्हणाला, “संपूर्ण सीझनमधील स्पर्धकांनी म्हणजेच इथे बसलेल्या सर्व स्पर्धकांनी व घराबाहेर पडलेल्या सर्व स्पर्धकांनी विकीबद्दल काय सांगितले, तर विकी त्याच्या बायकोमुळे आला होता”. यानंतर रोहित अंकिताला प्रश्न विचारतो की, “विकी नसता तर तुझा खेळ नेमका काय असता?”
यावर उत्तर देत अंकिता म्हणाली, “विकी नसता तर कदाचित मी आणखी काही करु शकले असते. कदाचित मी माझे निर्णय अधिक ठामपणे घेतले असते, असं मला वाटते. पुढे, रोहित शेट्टी अंकिताला म्हणतो, “विकीने बाहेर आल्यानंतर काहीतरी वेगळेच सांगितले आहे. अंकिता नसती तर कदाचित माझा खेळ वेगळा असता” असं विकीने म्हटलं आहे. यावर अंकिता लोखंडेने भाष्य करत म्हटलं की, “त्याला ही असं वाटू शकत”.
आणखी वाचा – प्रथमेशने मुग्धाच्या बहिणीला दिलं खास सरप्राइज, मेहुणीबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाला…
रोहित शेट्टीने यावेळी अंकिता त्याला खेळताना कशी अडवायची हे देखील विकी जैनने सांगितले. हे ऐकून अंकिता आश्चर्यचकित होते आणि म्हणते, “सर, तो इतका खोटारडा आहे, मी त्याला कधीच अडवले नाही”. दरम्यान, अभिषेक कुमार सांगताना दिसतो की, “विकी जैनने त्याच्या शेवटच्या संभाषणातही याच गोष्टीचा उल्लेख केला होता. विकीने अंकिताला न आवडणाऱ्या लोकांशी मैत्री कशी तोडायची हे शिकवलं”. शेवटी अभिनेत्री म्हणाली, “मी त्याला खेळाबाबत काहीही बोलले नाही”.