टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या बरीच चर्चेत असलेली पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस १७’मधील वावरामुळे ही अभिनेत्री लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ‘बिग बॉस १७’मध्ये अंकिता लोखंडेने पती विकी जैनसह ‘बिग बॉस’च्या घरात हजेरी लावली होती. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून ही जोडी विशेष चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली. अंकिता व विकी यांचं बॉण्डिंग, तसेच दोघांमध्ये होणारे सततचे वाद हे सर्व पाहता ही जोडी चर्चेत आलेली पाहायला मिळाली. (Ankita Lokhande Emotional)
अंकिता लोखंडेचा सोशल मीडियावरील वावरही बऱ्यापैकी मोठा आहे. नेहमीच ती सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अभिनेत्रीने ‘बिग बॉस’ संपल्यानंतर केलेल्या एका भावुक पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करत तिच्या श्वानाच्या मृत्यूची बातमी शेअर केली आहे. अंकिताही पेट लव्हर आहे हे सर्वांनाच माहित आहे. अंकिताचा स्कॉच या श्वानाचा मृत्यू झाला असल्याची पोस्ट तिने शेअर केली आहे.
“हे बाळा, मम्माला तुझी खूप आठवण येईल” असं म्हणत तिचा श्वान स्कॉचला श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी तिने तिच्या श्वानाचा एक सुंदर फोटोही शेअर केला आहे. अंकिताचा हा श्वान तिच्याकडे तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूत असतानापासूनचा आहे. अंकिता व सुशांत रिलेशनशिपमध्ये असताना दोघांनी याआधी त्यांच्या या श्वानाबरोबर बराच वेळ एकत्र घालवलेला पाहायला मिळाला होता. याआधी त्यांचे बरेच एकत्र फोटोही पाहायला मिळाले आहेत.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री बराच काळ डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यावेळी तिचा हा श्वान तिच्याजवळ होता. तेव्हा अभिनेत्रीने सोशल मीडियावरुन त्याच्याबरोबरचा एक फोटोदेखील पोस्ट केला होता. यानंतर आता थेट तिच्या लाडक्या श्वानाच्या मृत्यूची बातमी तिने शेअर केली आहे. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर अंकिताला ही पहिली वाईट बातमी ठरली. अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिच्या श्वानाला श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर हिने देखील कमेंट करत “बाप रे देव त्याच्या आत्म्याला शांती देवो” असं म्हटलं आहे.