गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : मतदानाची मशीन बंद, तासन् तास लोक रांगेत अन्…; आदेश बांदेकरांनी पवईतील प्रकार आणला उघडकीस, दाखविली सत्य परिस्थिती

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 20, 2024 | 12:52 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aadesh Bandekar Angry On Voting System

Video : मतदानाची मशीन बंद, तासन् तास लोक रांगेत अन्…; आदेश बांदेकरांनी पवईतील प्रकार आणला उघडकीस, दाखविली सत्य परिस्थिती

आज सकाळपासून महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. नागरीक सकाळपासूनच आपला हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. मुंबईच्या सहा जागांसह राज्यातील एकूण १३ मतदारसंघात आज मतदान होत आहे. तर यांत कलाकार मंडळींचाही सहभाग आहे. अनेक सेलिब्रिटी कलाकार मंडळींनी मतदानाचा हक्क बजावलेला पाहायला मिळत आहे. दरम्यान अभिनेते आदेश बांदेकर यांनी निवडणूक व्यवस्थेवर नाराजी व्यक्त करत शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. (Aadesh Bandekar Angry On Voting System)

आदेश बांदेकर यांनी मतदान केंद्रातील एक व्हिडीओ शेअर करत त्याठिकाणी झालेला गोंधळ दाखवत म्हटलं की, “मी आता पवई केंदात आहे. हिरानंदानीसारखा सुशिक्षित असा हा भाग आहे. आणि याठिकाणी सगळ्यांची अशी प्रतिक्रिया पहिली तर ५७,५८ ही यादी बंद झाली आहे. सगळ्या मशिनी बंद झाल्या आहेत. हिरानंदानी फाऊंडेशन शाळेजवळील बराच मशिनी बंद झाल्या आहेत. सकाळपासून अनेक मतदार इथे उभे आहेत. अनेक लोक परतून गेली आहेत. वयस्कर मंडळी तीन-तीन तास रांगेत उभे आहेत”.

आणखी वाचा – मतदानासाठी सिनेसृष्टीही सरसावली, कलाकारांमध्ये मतदानाचा उत्साह, फोटो केले शेअर

View this post on Instagram

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar)

या व्हिडीओमध्ये नागरिक त्रस्त असलेले पाहायला मिळत आहेत. अडीच-तीन तास रांगेत उभे असल्याचं नागरिक सांगत आहेत. “मतदान करणं हे आवश्यक आहे, म्हणून इथे उभे आहोत, पण इतके तास उभं राहणं फार कठीण आहे”, असं बोलत आहेत. शिवाय मशिनी बंद आहेत आणि अजून यावर कोणीही काहीही येऊन सांगत नसल्याचंही नागरिक बोलत आहेत. झोनल ऑफिसर अश्विनी यांनीही अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

आणखी वाचा – अप्पी सिंबाला सांगणार त्याच्या बाबांची गोष्ट, अमोलच्या वाढदिवसाला तरी होणार का त्याची बाबांबरोबर भेट?, नवा प्रोमो

या व्हिडीओमध्ये वयस्कर नागरिक, तसेच इतरही नागरिक त्रस्त असून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तीन-चार तास रांगेत उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. आदेश बांदेकर यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ऐनवेळी मतदानाच्या बूथवर झालेला गोंधळ पाहायला मिळत आहे. निवडणूक व्यवस्थेवर नाराजी व्यक्त करत समस्त नागरिकांच्या बाजूने आपले मत ते या व्हिडीओतून मांडताना दिसत आहेत.

Tags: Aadesh BandekarAadesh Bandekar Angry On Voting Systemloksabha election 2024marathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

suhasini mulay Wedding
Entertainment

वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; ‘लगान’ फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…

जून 18, 2026 | 3:54 pm
Tula Pahata Movie
Entertainment

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

जून 18, 2026 | 2:00 pm
Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Anushka Sarkate Kelvan
Entertainment

Video : अनुष्का सरकटेच्या केळवणाचा न्याराच थाट, ‘वचन दिले तू मला’ मालिकेची टीम हजर, खास पदार्थ अन्…

जून 18, 2026 | 10:29 am
Next Post
Bollywood actress Yami Gautam given birth to a boy and she has shared a post about it through Social Media.

मुलगा झाला हो! यामी गौतम झाली आई, नावही केलं जाहीर, म्हणाली, "आमच्या मुलाच्या”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.