‘बिग बॉस’ हा शो पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. या शोमधील लोकप्रिय जोडी अंकिता लोखंडे व विकी जैन हे तर आणखीनच प्रसिद्ध झाले आहेत. या जोडीमधील भांडणं ही प्रेक्षकांसाठी काही नवीन नाहीत. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये विकी जैन व अभिषेक कुमार यांच्यातील जोरदार वादाच्या वेळी, अंकिताचा नवरा विकी जैनचा राग अनावर झाला. अभिषेक व विकी यांच्यात खाण्याच्या पदार्थावरून जोरदार वाद सुरू होता, पण त्याच दरम्यान अंकिता भांडणाच्या मध्ये बोलल्याचं विकीला सहन झालं नाही. दरम्यान त्याने तिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला. (Ankita Lokhande’s Mother Reaction On Vicky Jain Slapped To Actress)
अंकिता-विकी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच यावर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. “विक्की भैया आपल्या पत्नीबरोबर चारचौघात कसा वागत आहे, अंकितालाही माहित होते की काय होणार आहे, पण नातेसंबंधामुळे अंकिता गप्प राहिली” अशा अनेक कमेंट्सद्वारे प्रेक्षकांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. अशातच आता या प्रकरणावर अंकिताच्या आईनेही प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा – ऑस्कर विजेता अभिनेता ली सन-क्यूनचा संशयी मृत्यू, मृतदेहाशेजारी सुसाइड नोटही सापडली अन्…
अंकिताची आई वंदना लोखंडे यांना या विकीने अंकितावर हात उचलल्याच्या व्हिडीओबाबत विचारण्यात आले असता, त्या असं म्हणाल्या की, “हे पूर्णपणे चुकीचे आहे. मी विकीलाही ओळखते. तो माझ्याबरोबर राहतो. मी त्याला चांगलं ओळखते. हे पूर्णपणे चुकीचे आहे, असे काही घडले नव्हते. कारण ते एकमेकांवर खूप प्रेम करणारे जोडपं आहे.”
दरम्यान, अंकिताच्या आईने दिलेल्या प्रतिक्रियेवरदेखील नेटकऱ्यांनी आता कमेंट्स केल्या आहेत. अंकिताच्या आईंचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर अनेकांनी “अंकिताची आई खोटं बोलत आहे, सामान्य प्रेक्षकांना सगळं माहीत आहे. अंकिताची आई तिच्या लेकीचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्ही जसे म्हणत आहात, तसे त्या दोघांमध्ये दिसत नाही आहे” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांनी विकीच्या वागण्यावर व अंकिताच्या आईने विकीच्या वागण्याचे केलेले समर्थन यावर टीका केली आहे.