‘पॅरासाइट’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला दक्षिण कोरियाचा अभिनेता ली सन-क्यून याच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. अभिनेता ली सन-क्यून सोलमधील एका उद्यानात मृतावस्थेत आढळला. कोरियामधील योनहॅप या वृत्तसंस्थेने त्याच्या मृत्यूबाबत माहिती दिली आहे. बेकायदेशीर औषधांवर सरकारी कारवाई सुरू असताना ही बातमी आली असून लीची कथित ड्रग्सच्या वापराबद्दल सध्या चौकशी सुरू आहे. (Parasite Fame Actor Lee Sun Kyun Found Dead)
योनहॅपच्या म्हणण्यानुसार, ली बुधवारी सकाळी सोलमधील एका पार्किंगमध्ये कारमध्ये ब्रिकेट्सच्या शेजारी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. लीच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या महितीनंतर अभिनेत्याचा शोध लागला. तेव्हा त्याच्याबरोबार एक सुसाइड नोट मिळाली. ज्यामध्ये त्याने घर सोडल्याचेही सांगितले होते.

१९७५ मध्ये जन्मलेल्या ली सन-क्युन यांनी ‘पॅरासाइट’मधील श्रीमंत कुटुंबातील वडिलांच्या भूमिकेसाठी चांगलीच लोकप्रियता मिळवली. दक्षिण कोरियन चित्रपटसृष्टीतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानामध्ये २०१२ चा थ्रिलर ‘हेल्पलेस’ व २०१४ चा ‘हिट ऑल अबाउट माय वाइफ’ सारख्या चित्रपटांमधील प्रमुख भूमिकांचा समावेश आहे.
आणखी वाचा – “जो भी हैं सब तेरा…” स्वानंदी-आशिष यांनी एकेमकांसाठी गायले खास रोमॅंटिक गाणे, वडिलही रडू लागले अन्…
दरम्यान, अभिनेत्याच्या मृत्यूबाबत अचानक आलेल्या या वृत्ताने चाहत्यांना धक्का बसला असून अनेकांनी यावर शोक व्यक्त केला आहे. त्याच्या या मृत्यूमुळे अंमली पदार्थांच्या वापराच्या उलगडा होण्याची त्याच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.