Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ मधील अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन यांच्यातील भांडण सध्या चर्चेत आहे. दोघेही रोज एकमेकांवर टीका करत असतात. अंकिता बरेचदा विकीबाबत पझेसिव्ह होताना दिसली आहे, तर विकी अंकितावर वर्चस्व गाजवताना दिसला आहे. नुकत्याच दाखवण्यात आलेल्या प्रोमोमध्ये असे दाखवण्यात आले की, अंकिताने तिच्या पतीबरोबरच्या गोष्टी सुधारण्याचा वा संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला, परंतु विकीने त्याच्या बाजूने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विकीला नॅशनल टीव्हीवर लिप किस करणे आवडत नाही, असंही तो म्हणाला.
‘बिग बॉस १७’मध्ये असे दाखवण्यात आले होते की, अंकिता लोखंडेने तिच्या बाजूने सतत भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी अंकिताने नवा ड्रेस घातला, मेकअप केला आणि पती विकीला दाखवला. त्यावेळी विकीच्या गालावर तिने किस केले. ती तिच्या नवऱ्याच्या ओठावर किस करणार होती तेवढ्यात विकीने तिला थांबवले. तसेच तो कम्फर्टेबल नसल्याचेही तिला सांगितले. तो म्हणाला की, त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा करणे चांगले नाही हे समजून घे. यावेळी त्याने अंकिताला दु:खी न होता हसण्याचा सल्लाही दिला. विकी जैन म्हणाला, ‘कृपया गोष्टीला समजून घे. सारखं सारखं सांगणं योग्य वाटत नाही मंकू, रागावू नकोस, समजून घे आणि फक्त हसत रहा. प्लीज बिट्टू” असं त्याने म्हटलं आहे.
यावर अंकिताने पतीला विचारले की, “जेव्हा तो हे करु शकतो तर ती का करु शकत नाही?” यावर विकीने उत्तर दिले की, “पतीबरोबर फक्त एक भावना नसते. दिवसभर बोलू नकोस, मूडप्रमाणे वागत जा आणि मग किस करत सर्वकाही ठीक करा” असं नाही होत. यावर अंकिता म्हणाली, “निदान ती गोष्टी ठीक करण्याचा मी प्रयत्न करत आहे”. यावर विकीने सांगितले की, “मला नॅशनल टीव्हीवर लिप किस करायला आवडत नाही”. त्यानंतर अंकितानेही स्पष्टीकरण दिले की, “ती ओठांवर नव्हे तर गालावर किस करत होती”. यावर विकी म्हणाला, “मला टीव्हीवर ओठांवर किस करणे आवडत नाही”.
विकी व अंकिताची आई फॅमिली वीकमध्ये घरी आली होती. यावेळी विकीच्या आईने अंकिताला सांगितले की, जेव्हा तिने विकीला लाथ मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा सासरच्यांनी तिच्या आईला फोन करुन विचारले होते की, तुम्हीसुद्धा पतीबरोबर अशा वागत होता का? हे ऐकून अंकिता भावूक झाली आणि सासू-सासऱ्यांना म्हणाली की, “तिचे वडील नाही आहेत, त्यांना यांत आणू नका, तिची आई एकटीच राहते” असंही ती म्हणाली.