Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’च्या घरात अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्यातील भांडण दिवसेंदिवस वाढत चालला असल्याचं पाहायला मिळत आहे. दोघंही एकमेकांना बोलण्याची वा निचा दाखवण्याची एकही संधी सोडत नाहीत. नुकत्याच झालेल्या फॅमिली वीक दरम्यान, जेव्हा अंकिता व विकी यांच्या आईने घरात प्रवेश केला तेव्हा त्यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, शोमध्ये त्यांचं भांडण चांगलं दिसत नाही आणि ते पाहून त्यांच्या जवळचे लोक खूप नाराज झाले आहेत. असं असूनही दोघांच्या वागण्यात काहीही फरक पडलेला दिसत नाही.
नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अंकिता रागाने आयशाला विकीवर ढकलताना दिसत आहे. या शोच्या अनेक क्लिप व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये विकी अंकिताला विचारतो, “तुला नक्की काय प्रॉब्लेम आहे तो सांग? यावर अंकिता म्हणते, आता बस झालं. तेव्हा विकी म्हणतो, “तू मला स्त्रीवादी म्हणत आहेस का? यावर अंकिता म्हणते, “मी तुला स्त्रीवादी म्हणत नाही आहे, मी स्वतःचा विचार करत आहे. यावर विकी म्हणतो, तुझ्या वागण्यातून, हावभावातून मला तसंच दिसत आहे.
त्यांनतर आयशाकडे बोट दाखवत अंकिता विकीला काही गोष्टी सांगत असते. हे पाहून आयशा तिच्याकडे येते आणि म्हणते, “तुला मी विकीबरोबर राहिलेली आवडत नाही का? यावर अंकिता म्हणते, “मला सर्व काही आवडेल, जा कर” असं म्हणत अंकिता आयशाला बेडवर पडलेल्या विकीच्या दिशेने ढकलले. पुढे ती असंही म्हणते की, “मला माहित आहे तू मस्ती करत आहेस, पण ती मस्ती मर्यादेत राहून कर. यावर विकी म्हणतो, ” ही तुझी प्रतिक्रिया सर्व काही बिघडवते”. यावर अंकिता रागारागात बोलते की, “मी प्रतिक्रिया न देता मेल्यासारखं बघत राहू का?”
अंकिता ईशा व आयशासमोर विक्कीबद्दल बोलताना दिसते. अंकिता म्हणते, असं नाही आहे की तो स्त्रीवादी आहे. पण असं काहीतरी आहे ज्याने मला तस काहीतरी जाणवत आहे. तो असा नाही आहे हे माहित आहे. पण गोष्टी चुकीच्या होत आहेत, हे मी त्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हे ऐकून विकी डोळे मिटतो आणि म्हणतो, “‘बिग बॉसच्या घरातील माझे शेवटचे दिवस लवकर संपू दे” असं म्हणताना दिसतो.