शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“असं व्हायला नको होतं”, अंकिता लोखंडेची आई लेकीच्या सासूवर नाराज, खुलासा करत म्हणाली, “नात्यावर परिणाम…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 18, 2024 | 1:41 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 17 Latest News

"असं व्हायला नको होतं", अंकिता लोखंडेची आई लेकीच्या सासूवर नाराज, खुलासा करत म्हणाली, "नात्यावर परिणाम..."

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’चा फिनाले जवळ येत आहे. दरम्यान स्पर्धकांचा खेळ हा रंजक झालेला पाहायला मिळत आहे. या शोमध्ये स्पर्धक म्हणून आलेल्या अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्यात अनेक वाद-विवाद होताना पाहायला मिळाले. अशातच आता अंकिता लोखंडेची आई वंदना लोखंडे यांनी विकी जैनच्या आईबद्दल खुलासा केला आहे. फॅमिली वीक दरम्यान, विकी जैनच्या आईने अंकिताला सांगितले होते की, अंकिताने विकीला लाथ मारल्यानंतर तिच्या सासऱ्यांनी आईला फोन केला होता आणि विचारले होते की, “ती सुद्धा तिच्या पतीबरोबर असेच वागते का?” यावर आता अभिनेत्रीच्या आईने भाष्य केलेलं पाहायला मिळत आहे.

अंकिता लोखंडेच्या आईने ‘गलाटा इंडिया’सह बोलताना सांगितले की, “ही घटना आणि विकीच्या आईने केलेली कमेंट चुकीची आहे. असं व्हायला नको होतं”. वंदना लोखंडे म्हणाल्या, “अंकिता व विकी दोघेही अनेक महिन्यांपासून त्यांच्या पालकांपासून दूर आहेत. शोमध्ये असं व्हायला नको होतं. विकीला हे संभाषण झाले आहे याची जाणीवही नाही आणि त्याचा त्यांच्या नात्यावर परिणाम होऊ नये असं मला वाटतं”.

आणखी वाचा – “तुझं खरं रुप…”, अंकिता लोखंडे व मुन्नवर फारुकीच्या नात्यात फुट, अभिनेत्री नको नको ते बोलली अन्…; म्हणाली, “तू वाईट…”

अंकिताची आई पुढे म्हणाली की, “अंकिता रडत होती आणि काळजीत होती. मी तिला या सर्व प्रकाराबद्दल काहीच सांगितले नाही, परंतु ती स्वतः म्हणाली की, तिला आधीच हे सर्व माहित आहे”. जेव्हा मी तो प्रोमो पाहिला तेव्हा मला खूप वाईट वाटले. मला माहित आहे की अंकिताला तिच्या वडिलांची आठवण येत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “तो आधीपासूनच भित्रा अन्…”, देवोलिना भट्टाचार्जीचे अंकिता लोखंडे व विकी जैनवर आरोप, म्हणाली “ती पूर्णपणे चुकीची…”

याचबरोबर अंकिता लोखंडेच्या आईला विकी जैनच्या आईने प्रसारमाध्यमांमध्ये केलेल्या भाष्याबाबत विचारले असता त्यांनी विकीच्या आईला मत मांडण्याचा अधिकार असल्याचं सांगितलं. याशिवाय अंकिताची आई वंदना लोखंडे यांना एका मुलाखतीदरम्यान विकीने अंकितावर हात उचलल्याच्या व्हिडीओबाबत विचारण्यात आले असता, त्या असं म्हणाल्या की, “हे पूर्णपणे चुकीचे आहे. मी विकीलाही ओळखते. तो माझ्याबरोबर राहतो. मी त्याला चांगलं ओळखते. हे पूर्णपणे चुकीचे आहे, असे काही घडले नव्हते. कारण ते एकमेकांवर खूप प्रेम करणारे जोडपं आहे.”

Tags: ankita lokhandeankita lokhande motherankita lokhande mother in lawbigg bossbigg boss 17entertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg boss 17 before ankita lokhande Vicky jain had date actress tia bajpai see the details

अंकिता लोखंडेपूर्वी 'या' अभिनेत्रीला डेट करत होता विकी जैन, मालिकेमधील आहे सुप्रसिद्ध चेहरा, दोघांचं नातं चर्चेत होतं अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.