‘बिग बॉस १७’च्या घरातील कायमच चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन. हे दोघे शोमध्ये आल्यापासून त्यांच्यातील भांडणं, वाद यांमुळे चर्चेत राहीले आहेत. या जोडीमध्ये घरात आल्यापासून प्रेमापेक्षा अधिक संघर्षचं पाहायला मिळाला आहे. अंकिता व विकी यांच्या नात्यात अनेकदा दुरावाही आल्याचे पहीला मिळाले आहे. अभिनेत्रीने अनेकदा विकीपासून विभक्त होण्याचे भाष्य केले असल्याचे पाहायला मिळाले आहे.
‘बिग बॉस’च्या घरात अंकिताने अनेकदा तिच्या एक्स-बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपुतची आठवण काढली असल्याचे प्रेक्षकांनी पाहिले आहे. त्याच्या आठवणीत ती अनेकदा रडली असून त्याच्या बद्दलचे अनेक धक्कादायक खुलासेही तिने या शोमध्ये केले आहेत. यावरुनही अंकिता व विकी यांच्याट् अनेकदा मतभेद व खटके उडाले आहेत. विकीने अनेकदा अंकिताच्या या वागणुकीमुळे तिला ओरडले असल्याचे दिसून आले आहे. अशातच आता विकीच्या आयुष्यातही अंकिता आधी कुणीतरी एक अभिनेत्री होती अशा चर्चा रंगत आहेत.
विकीने अंकिता लोखंडेच्या आधीसुद्धा एका अभिनेत्रीला डेट केल्या असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे. ‘फिल्मीबीट’च्या एका वृत्तानुसार, विकीच्या आधीच्या गर्लफ्रेंडचे नाव ट्विंकल बाजपेयी असं आहे आणि तिला टिया बाजपेयी म्हणूनही ओळखले जाते. ही दोघे २०१२मध्ये रिलेशनमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. विकी बॉक्स किकेट लीगच्या टीमचा मालक होता आणि यानिमित्ताने त्यांची भेट झाली होती.
अर्थात विकी किंवा ट्विंकल यांच्यापैकी दोघांनीही याआधी त्यांच्या नात्याबद्दल कधीही अधिकृतपणे भाष्य केलेले नाही. दरम्यान, ट्विंकल बाजपेयी म्हणजेच टियाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने ‘क्युकी सास भी कभी बहु थी’, ‘घर की लक्ष्मी बेटिया’, ‘अनहोनो का अंधेरा’ सारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे व ‘हंटेड’, ‘१९२० एविल रीटर्न’ सारख्या चित्रपटांतही काम केले आहे.