सध्या सर्वत्र लॉरेन्स बिश्नोइची दहशत असलेली पाहायला मिळत आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानला त्याने आजवर अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे सलमानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली. त्यापाठोपाठ आता ‘बिग बॉस १६’ चा विजेता मुनव्वर फारुकी सध्या खूप चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याला गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोइकडून धमक्या मिळत असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु होत्या. त्यानंतर त्याला सुरक्षा देण्यात आली. मुनव्वर अनेकदा सुरक्षेमध्येच घराच्या बाहेर पडताना दिसतो. अशातच आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडीओ समोर आला असून त्याबद्दल आता मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. (munawar faruqui security)
मुनव्वरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. तो एका कामानिमित्त बाहेर पडला होता. मात्र यामागील नक्की कारण काय? याबद्दल सविस्तर काही कळू शकले नाही. पण मागच्या महिन्यात धमकी मिळाल्यापासून तो पहिल्यांदाच बाहेर पडलेलं पाहायला मिळालं. यावेळी तो कडक सुरक्षेमध्ये दिसून आला आणि लगेचच तो होडीमध्ये बसून निघून गेला.मुनव्वरचा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “घाबरला बिचारा”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली की, “डोळ्यामध्ये बिश्नोइची भीती दिसत आहे”, तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “स्वस्तातली सुरक्षा मिळाली आहे याला”.
दरम्यान मुनव्वर हा नेहमी चर्चेत असलेला दिसून येतो. त्याने एका शोमध्ये हिंदू देवी-देवतांची मस्करी केली होती. या प्रकरणी त्याला तुरुंगाची हवादेखील खायला लागली होती. त्यानंतर तो ‘लाफ्टर शेफ्स’मध्ये देखील दिसला होता. याशिवाय तो एल्विश यादवबरोबर ‘प्लेग्राऊंड ४’ मध्येही दिसून आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ दिवसांत सलमान खानला पाचव्यांदा धमकी मिळाली आहे. याआधीही त्याला तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमक्या आल्या होत्या. दरम्यान, अभिनेता सलमान खान सध्या हैदराबादमध्ये आहे. तो त्याच्या ‘सिकंदर’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. पुढील वर्षी ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन ए आर मुरुगदास करत आहेत.