सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रिया बापट व उमेश कामतने लिप किस करतानाचा फोटो केला शेअर, क्युट रोमँटिक क्षणांनी वेधलं लक्ष, पोस्ट व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 8, 2024 | 11:45 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Priya Bapat And Umesh Kamat Romantic Photo

प्रिया बापट व उमेश कामतने लिप किस करतानाचा फोटो केला शेअर

Priya Bapat And Umesh Kamat Romantic Photo : मनोरंजनसृष्टीत अशी अनेक कलाकार मंडळी आहेत, ज्यांनी आपल्या सह-कलाकाराची जोडीदार म्हणून निवड केली. अशीच एक जोडी आहे, जी प्रेक्षकांच्या आवडत्या जोडीपैकी एक आहे ती म्हणजे अभिनेत्री प्रिया बापट व अभिनेता उमेश कामत. मराठीतील एक क्युट जोडी म्हणून प्रिया व उमेश यांच्याकडे पाहिलं जातं. नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये हे दोघं एकत्र दिसले असून या दोघांनीही त्यांच्या अभिनयाच्या कौशल्यावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सध्या ही जोडी रंगमंचाकडे वळली असल्याचं दिसतंय. दर्जेदार नाटक करत, आणि नाटकांची निर्मिती करत ही जोडी आता एक पाऊल पुढे टाकताना दिसत आहे.

सोशल मीडियावरही उमेश व प्रिया बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. विशेषतः एकत्र रोमँटिक फोटो पोस्ट करत ही जोडी नेहमीच चर्चेत राहिली आहे. या जोडीचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या उमेश व प्रिया परदेश दौरा करताना दिसत आहेत. परदेशातील या जोडीने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ते लिप किस करताना दिसले. दोघांचा हा लिप किस करतानाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या या फोटोंवर पल्लवी पाटील, अहाना कुमरा, आशुतोष गोखले अशा कलाविश्वातील मंडळींनीही हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा – अंकिता वालावलकरने होणाऱ्या नवऱ्याला दिलं महागडं गिफ्ट, तक्रार करत शेअर केला व्हिडीओ, म्हणाली, “किंमत नाही आणि…”

View this post on Instagram

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

गेल्या महिन्यात ६ ऑक्टोबरला प्रिया व उमेश यांच्या लग्नाला १३ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने प्रियाने उमेशसाठी खास पोस्ट शेअर केली होती. प्रियाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले होते की, “आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. १३ वर्षांचे लग्न आणि २० वर्षांची एकमेकांची साथ. प्रेम, हसू आणि तुला जेवायला काय हवं आहे हे विचारल्याची ही खूपच वर्षे आहेत”.

आणखी वाचा – Video : अमेरिका दौऱ्यानंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या शुटींगला पुन्हा एकदा सुरुवात, प्राजक्ता माळीने शेअर केला खास व्हिडीओ

प्रिया-उमेशची खऱ्या आयुष्यातील लव्ह स्टोरी अनेकांना माहित आहे. प्रिया व उमेशमध्ये तब्बल आठ वर्षांचे अंतर आहे. १२ वी मध्ये असतानाच प्रिया उमेशच्या प्रेमात असल्याचा खुलासा तिने ‘दोन स्पेशल’ या कार्यक्रमात केला होता. प्रियाने जेव्हा उमेशला प्रपोज केले होते, तेव्हा ती फारच लहान होती आणि उमेशने होकार द्यायलाही बराच वेळ घेतला होता. त्यांच्या नात्याला सुरुवातील घरुन विरोध झाला होता, मात्र २०११ मध्ये त्यांनी कुटुंबीयांच्या परवानगीने लग्नगाठ बांधली.

Tags: marathi celebrity couplepriya bapat and umesh kamatPriya Bapat And Umesh Kamat Romantic Photo
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
munawar faruqui security

लॉरेन्स बिश्नोइच्या धमकीनंतर पहिल्यांदाच दिसला मुनव्वर फारुकी, कडक सुरक्षेमध्ये येताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, “घाबरला…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.