अभिनेत्री शहनाज गिल रुग्णालयामध्ये भरती असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. तिने स्वतःही रुग्णालयामधील व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना याबाबत सांगितले. शहनाजच्या उत्तम आरोग्यासाठी चाहतेमंडळी प्रार्थना करत आहेत. आता शहनाज नंतर आणखी एक अभिनेत्री रुग्णालयामध्ये भरती झाली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. अभिनेत्री जस्मिन भसीन रुग्णालयामध्ये भरती झाली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे फोटो पोस्ट करत तिने याबाबत सांगितलं. तिने रुग्णालयामध्ये भरती होण्यामागचं कारणंही सांगितलं.
जस्मिनने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती रुग्णालयामध्ये बेडवर झोपलेली दिसत आहे. तसेच तिच्यावर उपचार सुरु असल्याचं यामधून दिसत आहे. फोटो शेअर करत तिने पोटामध्ये इन्फेक्शन झालं असल्याचं सांगितलं. पण आता नेमकी तिची प्रकृती कशी आहे? हे जस्मिनने सांगितलं नाही. तिच्या पोस्टनंतर चाहतेही चिंतेत पडले आहेत. पोटामध्ये इन्फेक्शन कशामुळे झालं? याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही.
जस्मिन काही दिवस कर्जतमध्ये राहत होती. बॉयफ्रेंड अली गोनी व मित्र-मंडळींबरोबर तिने तिथे एकत्रित वेळ घालवला. अली व जस्मिनने यादरम्यानचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले होते. तिथे नेमकं काय घडलं? कधी जस्मिनला रुग्णालयामध्ये नेण्यात आलं याबाबत दोघांनीही बोलणं टाळलं आहे.

जस्मिन व अली मागील काही वर्षांपासून एकमेकाला डेट करत आहेत. ‘बिग बॉस १४’मध्ये प्रवेश केल्यानंतर या दोघांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली. या दोघांच्या जोडीला चाहत्यांचीही अधिकाधिक पसंती मिळताना दिसते. तसेच अली व जस्मिन अगदी खुलेपणाने एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करताना दिसतात. आताही जस्मिन रुग्णाल्यामध्ये असताना अली तिची उत्तमरित्या काळजी घेत आहे.