शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गोविंदाच्या भाचीच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, आरती सिंहचं सजलं घर, फोटो शेअर करत म्हणाली, “नवी सुरुवात…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 1, 2024 | 1:31 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Bigg Boss 13 fame Aarti Singh's wedding preparations started actress shared the photos

गोविंदाच्या भाचीच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, आरती सिंहचं सजलं घर, फोटो शेअर करत म्हणाली, "नवी सुरुवात..."

टीव्ही अभिनेत्री, ‘बिग बॉस १३’ची स्पर्धक आणि बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आरती सिंह ही काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नाच्या कारणावरून चांगलीच चर्चेत आली होती. काही दिवसांपूर्वी कृष्णा अभिषेकने आरतीच्या लग्नाबाबतची मोठी बातमी शेअर केली होती. यावेळी त्याने खुलासा केला की, आरती तिचा प्रियकर दिपक चौहानसह लग्न करणार असल्याचे सांगितले होते. अशातच आता तिच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

अभिनेत्रीने नुकताच तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिने बाल्कनीत उभे राहून छान पोज देत फोटो काढले आहेत. या फोटोमध्ये तिने लाल रंगाची भरजरी साडी नेसली आहे. तसेच हातात बांगड्या व केसात गजरादेखील माळला आहे. तिच्या या लूकमध्यी ती अगदी नवी नवरीसारखी दिसत आहे. त्यामुळे लवकरच आरतीचे लग्न होणार असून आता ती तिच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु करणार आहे.  

View this post on Instagram

A post shared by Arti singh sharma (@artisingh5)

आणखी वाचा – ‘सातव्या मुलीची…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं डोंबिवलीमध्ये आहे गिफ्टचं दुकान, अजूनही आई-बाबा करतात व्यवसाय, म्हणाली, “आमच्या दुकानात…”

आरतीने लाल रंगाच्या साडीतील हे खास फोटो शेअर करत त्याखाली ‘लाल ईश्क’ असं म्हटलं आहे. दरम्यान तिने शेअर केलेल्या या फोटोखाली तिच्या अनेक चाहत्यांनी लाईकस व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी या फोटोखाली “खूप छान, खूपच सुंदर, मनमोहक, वाह क्या बात है” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. तसेच अनेकांनी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.

आणखी वाचा – “राग, वेदना, असहाय्यता अन्…”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर भारावली अमृता खानविलकर, अंकिता लोखंडेचे कौतुक करत म्हणाली, “मला तुझा अभिमान…”

आरतीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरही एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो शेअर करत तिने “नवीन सुरुवात” असं म्हटलं आहे. त्यामुळे अभिनेत्री आता कधी विवाहबंधनात अडकणार? याची तिच्या चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. दरम्यान, आरतीचा होणारा नवरा म्हणजेच दीपकबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. पण काही मीडिया रिपोर्टनुसार तो एक व्यवसायिक असल्याचे म्हटले जात आहे.       

Tags: Aarti Singhbollywood actressBollywood entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Twinkle Khanna On Zomato

"उच्च-नीच, अस्पृश्यता अन्…", झोमॅटोच्या शुद्ध शाकाहारी वादावर ट्विंकल खन्नाचं सडेतोड उत्तर, म्हणाली, "मांसाहारी-शाकाहारी करण्यापेक्षा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.