सध्या ‘बिग बॉस ओटीटी ३’ ची सर्वत्र चर्चा आहे. यावेळी सहभागी असणाऱ्या सदस्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसून येते. हा शो सुरु झाल्यापासून अनेक ट्विस्ट आलेले पाहायला मिळाले. सदस्य विशाल पांडे व अरमान मलिक यांच्यातील भांडण हे याआधीही पाहायला मिळाले होते. आता पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडलेली दिसून आली आहे. नुकत्याच समोर आलेल्या एपिसोडमध्ये विशाल व अरमान यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरुन त्यांना ‘बिग बॉस…’ च्या घरामध्ये धुसफूस असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. (vishal pandey on armaan malik)
‘बिग बॉस…’मध्ये स्पर्धकांना जोंबी टास्क देण्यात आला होता. शिवानी कुमारी ही या खेळाची मुख्य होती. याचवेळी शिवानीने कृतिकाला खेळातून बाहेर जाण्यास सांगितले आणि त्यानंतर दोघींमध्ये मोठे भांडण झाले. तेव्हा पत्नीचा बचाव करण्यासाठी अरमानमध्ये आला. अरमान जेव्हा शिवानीबरोबर भांडत होता तेव्हा विशाल मध्ये आला आणि शिवानीवर ओरडण्यापासून रोखले. त्यानंतर त्या दोघांमध्ये मोठे भांडण झाले आणि अरमानने विशालला धक्का दिला. त्यांच्यामधील वाढलेले भांडण पाहून रणवीर शोरी मध्ये पडला व भांडण संपवण्याचा प्रयत्न करु लागला.
त्यानंतर अरमान कृतिका व साई केतन राव यांच्याबरोबर लिव्हिंग एरियामध्ये बसले होते. यावेळी त्यांच्यामध्ये भांडणाबद्दल चर्चा सुरु झाली. यावेळी बॉडी शेमिंगचा कसा सामना करावा लागला तसेच त्याच्या शिक्षणाबद्दलही भाष्य करताना आठवी फेल असल्याचेही बोलले गेले असल्याचे त्याने सांगितले.
त्यानंतर तो म्हणाला की, “सना मकबुलचे करियर ठीक नाही, विशालला शोधतादेखील येत त्यामुळे तो इथे आला आहे. नैजि तर गायबच होता तो आता आला आहे. करियरमध्ये फ्लॉप होऊन इथे आले आहेत जेणेकरुन याठिकाणी त्यांना प्रसिद्धी मिळू शकेल. लवकेश तर स्वतःचे नावही निर्माण करु शकला आहे. मात्र इथेही येऊनही तो काही करु शकला नाही”. या प्रकारानंतर आता अरमान व विशाल यांच्यामध्ये नेहमी वाद चांगलेच टोकाला गेलेले दिसून येत आहेत त्यामुळे आता या सगळ्याचे काय पडसाद उमटतात हे पाहाण्यासारखे आहे.