बच्चन कुटुंबात नवी सून येणार का? असा प्रश्न सोशल मीडियावर बराच चर्चेत व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांच्यातील मतभेदाच्या बातम्या सध्या चर्चेत आल्या आहेत. या बातम्यांदरम्यान, चाहत्यांच्या समोर एक व्हिडीओ समोर आला आहे. समोर आलेल्या व्हिडीओवरुन लवकरच घरात नवीन सून येऊ शकते अशी चर्चा रंगली आहे. अलीकडेच अमिताभ बच्चन यांचा नातू म्हणजेच अगस्त्य नंदा त्याची अफवा असलेली गर्लफ्रेंड सुहाना खानबरोबर स्पॉट झाली होती. यावेळी अभिषेक बच्चन व नव्या नवेली नंदा देखील दिसले. व्हिडीओबरोबर काही फोटोही समोर आले आणि चर्चा सुरु झाल्या. (Bachchan Family New Daughter In Law)
विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ त्याने काही वेळाने त्याच्या अकाउंटवरुन काढून टाकला. या व्हिडीओमध्ये अगस्त्य नंदा आणि सुहाना खान एकत्र दिसत होते. मुंबईच्या पावसात अगस्त्य नंदा सुहानाला त्याच्या मामाच्या आलिशान कारमध्ये बसवताना दिसला आणि मग भिजत त्या गाडीत पुढच्या सीटवर येऊन बसला. सुहानाबरोबर नव्या नवेलीही दिसली होती. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता चाहत्यांनी सुहाना व अगस्त्य यांच्यातील प्रेमासंबंधांची बातमी खरी असल्याचा अंदाज लावला आहे.

व्हिडीओमध्ये त्यांच्या या भेटीदरम्यान अभिषेकने काळी हुडी परिधान केली होती. त्याच्याबरोबर पुढच्या सीटवर बसलेल्या अगस्त्याने निळ्या रंगाचा डेनिम व स्नीकर्स असलेला काळा टी-शर्ट घातला होता. सुहानाही नव्याबरोबर कारच्या मागील सीटवर कॅज्युअल आउटफिटमध्ये दिसली होती.
या व्हिडीओवर नेटकरी सातत्याने कमेंट करत आहेत. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने असे लिहिले आहे की, “आता असे वाटते की अफेअरची बातमी खरी आहे”. तर दुसऱ्या युजरने असे लिहिले आहे की, “तर सुहाना बच्चन कुटुंबाची सून बनेल”. चाहते या व्हिडीओवर सतत हार्ट इमोजी शेअर करत आहेत. अगस्त्य नंदा आणि सुहाना खानच्या डेटींगच्या बातम्या ‘द आर्चिज’पासून चर्चेत आहेत. ते अनेकवेळा एकत्र दिसले आहेत.