सध्या सर्वत्र ‘बिग बॉस ओटीटी ३’ची हवा आहे. हा शो सुरु झाल्यापासून अनेक ट्विस्ट आलेले पहायला मिळाले आहेत. या आठवड्यात घरातील सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. या सात सदस्यांमध्ये विशाल पांडे, लवकेश कटारिया,सना मकबुल व सना सुलतान यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सतत चर्चेत राहणारा सदस्य या पूर्ण आठवड्यासाठी नॉमिनेट केला गेला होता. तसेच वाइल्ड कार्डने घरामध्ये आलेला सदस्य अदनान शेख हाही नॉमिनेट होण्याच्या मार्गावर आहे. अशातच आता पुन्हा एकदा ‘बिग बॉस ओटीटी’मधून एक अपडेट समोर आली आहे. (lavkesh kataria on armaan malik)
समोर आलेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस’ने घरातील प्रमुख व्यक्ती अरमानला नॉमिनेट करण्याची संधी दिली आहे. त्यानंतर अरमानने घरातील चार सदस्यांची नावं घेतली. यामध्ये सना मकबुल, सना सुलतान, लवकेश व विशाल यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र या सर्वांमध्ये चर्चा रंगली ती लवकेश व अरमान यांच्या भांडणाची. दोघांचा भांडणाचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये लवकेश अरमानला त्याच्या खासगी आयुष्यावर भाष्य करताना दिसत आहे.
अरमान व लवकेश यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळाली. लवकेश अरमानला संबोधून म्हणाला की, “जो त्याच्या पत्नीचा झाला नाही तो दुसऱ्यांचा काय होणार?”, अरमानचे पायलबरोबर पहिले लग्न झालेले असतानाही त्याने पत्नीच्याच खास मैत्रिणीबरोबर लग्न केले. त्यामुळे त्याच्यावर सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली.
अरमानने सदस्यांना नॉमिनेट केल्यानंतर तो अधिक खुश दिसून आला. मात्र सना मकबुलबरोबर त्याचे संबंध चांगले असतानाही तिचे नाव घेतल्याने ती नाराज झालेली पाहायला मिळाली. याविषयी सना सुलतान व सना मकबुल यांच्यामध्ये बोलणंदेखील झाले. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, विटो पॉवर टास्क साठी रणवीर शोरी, साई केतन राव,शिवानी कुमारी व नैजीची निवड करण्यात आली होती. यामध्ये रणवीर शोरी जिंकला होता. याचवेळी वैद्यकीय कारणामुळे दिपक चौरसियाला नॉमिनेट करण्यात आले होते.