टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडे ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. ‘बिग बॉस 17’मध्ये ती पती विकी जैनबरोबर दिसून आली होती. यावेळी तिच्या व विकीच्या भांडणाची चर्चादेखील खूप झाली होती. तसेच या कार्यक्रमामध्ये अंकिताच्या सासू व आईने देखील हजेरी लावली होती. तेव्हाही सासूने अंकितावर धक्कादायक आरोप केले होते. ‘बिग बॉस’नंतर विकी व अंकिता घटस्फोट घेतील अशा चर्चादेखील सुरु झाल्या. मात्र असे काहीही नसल्याचे तिने सांगितले. त्यावेळी अंकितावर मोठ्या प्रमाणात टिकादेखील करण्यात आली होती. पण आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. (ankita lokhande wearing shorts)
अंकिताचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती मंदिराच्या बाहेर दिसून येत आहे. यामध्ये तिने शॉर्ट्स घातली असून मोठा टी-शर्ट परिधान केला आहे. तसेच तिच्या हाताला फ्रॅक्चर असलेलेदेखील दिसून येत आहे. अंकिताला काम करणं तसेच फिरणेदेखील कठीण झाल्याचे दिसून येत आहे. जेव्हा फोटोग्राफर्स तिच्याशी बोलू लागले तेव्हा तिचे हावभाव खूप विचित्र होते.
मंदिरात जाताना तिने लहान शॉर्ट्स घातल्याने अनेकांनी नाराजी दर्शवली आहे. तसेच तिच्या हेअरस्टाईलचीही मस्करी केली आहे. तसेच फोटोग्राफर्सची साधलेल्या संवदामुळेही तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे.
हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला तेव्हा नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “मंदिरात असे कपडे घालून कोण जातं?”, दुसरा नेटकरी लिहितो की, “ही अशी का वागत आहे”, तसेच अजून एक नेटकरी लिहितो की, “ही वेडी झाली आहे का?”, एका नेटकऱ्याने तिच्या हेअरस्टाईलवर प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, “या हेअरस्टाईलमध्ये किती विचित्र दिसत आहे”.
काही दिवसांपूर्वी वादळ आल्याचा व्हिडीओदेखील तिने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यामध्ये घराच्या बाल्कनीमधून वादळ बघून तिला धक्का बसल्याचे बघायला मिळाले. या व्हिडीओला देखील नेटकऱ्यांनी खूप प्रतिक्रिया दिल्या होत्या. तसेच अंकिता खूप अति करत असल्याचेही म्हणाले होते.