छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाची १५ ऑक्टोबर म्हणजेच काल सुरुवात झाली आहे. कार्यक्रमाचा भव्य प्रीमियर झाला ज्यात या पर्वात समाविष्ट होणाऱ्या सर्व स्पर्धकांच्या नावाचा खुलासा झाला. या सीजनमध्ये टिव्ही सेलिब्रिटींपासून ते अनेक युट्युबर्सदेखील या शोमध्ये समाविष्ट झाले आहेत. ज्यात अंकिता लोखंडे, मुनावर फारुकी, अभिषेक कुमार, विकी जैन, ईशा मालवी, सनी यांच्यासह अनेक नावांचा समावेश आहे. (Big boss 17 first episode promo out)
यातच या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात बरेच धमाका पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्याच दिवशी युद्धाचा आखाडा बनला आहे. प्रोमोत अंकिता लोखंडे व विकी जैन यांनी कार्यक्रमात प्रवेश करताच त्यांच्यात मतभेद झाले असल्याचं प्रोमोत दिसत आहे. तर अभिषेक कुमारचा आक्रमक लूकही पाहायला मिळत आहे.
Tomorrow Episode Promo #BiggBoss17pic.twitter.com/MRWajsesFE
— #BiggBoss_Tak???? (@BiggBoss_Tak) October 15, 2023
नेमकं झालं असं की विकी घरवाल्यांबरोबर खोल्या निवडण्याचा खेळ खेळत असतो. ज्यानंतर ‘बिग बॉस’ त्याला अडवतात. “जर तुला तुझं डोकं चालवायची इतकीच हौस आहे तर तु या अगोदर अंकिताच्या मागे मागे रुम नंबर एकमध्ये का गेला होता?”, हे ऐकून अंकिता उठते आणि विकीपासून दूर निघून जाते.प्रोमो पुढे अभिषेक व ईशामधील वादही दाखवण्यात आला आहे, जो खूप टोकाला गेला आहे. या व्हिडिओमध्ये अभिषेक घरातील दोन स्पर्धक सनी आर्या व अरुण यांच्याशी भांडताना दिसत आहे. प्रोमो पाहिल्यानंतर असं वाटतंय की यंदाचा ‘बिग बॉस’ पहिल्या सीझनसारखाच रंजक होणार आहे.
‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वात अकांती-विकी, ऐश्वर्या शर्मा- नील भट्ट, ईशा मालवीय – अभिषेक कुमार, सनी आर्य, अनुराग डोबल, सना खान, मन्नारा चोप्रा, मुनावर फारुकी, अरुण यांच्यासह अनेक अप्रतिम स्पर्धक या सीजनमध्ये पाहायला मिळणार आहेत.