मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे क्रांती रेडकर. तिने आजवर बऱ्याच चित्रपटांत काम करत आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या ती अभिनय क्षेत्रापासून लांब असली तरीही नुकतंच तिने छोट्या पडद्यावरील ‘ढोलकीच्या तालावर’ कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका उत्तमरित्या पार पाडताना दिसली होती. क्रांती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. विशेष म्हणजे तिच्या दोन जुळ्या मुलींचे व्हिडिओ व फोटो ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. असाच तिने तिच्या मुलींचा एक अतरंगी करामतीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. (Kranti redkar shared a video of daughters)
क्रांतीला दोन जुळ्या मुली आहेत. ती नेहमी त्यांचे गोड क्षण तिच्या चाहत्यांना शेअर करत असते. चाहत्यांनाही तिच्या मुलींचे व्हिडिओ बरेच आवडताना दिसतात. आताही तिने तिच्या मुलींचा नवीन व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत क्रांती तिच्या मुलींची करामत सांगताना दिसते. ती सांगते, “आमच्याकडे पक्षांच घरटं बनवण्याची योजना आखली जात होती. तो हा प्रोग्राम आहे”. क्रांतीने कॅमेरा खाली फिरवला. तिथे कात्री, कापडं आणि बॉक्स पडलेला दिसत आहे. क्रांती पुढे सांगते, “या बॉक्समध्ये पक्षांना ठेवण्यासाठी गवत सापडत नव्हती म्हणून छबीलने स्वतःचेच केस कापून गवत बनवलं. मी योग्यवेळी येऊन हा प्रयोग थांबवल्यामुळे छबीलचे केस वाचले. नाहीतर पक्षी छबीलच्या केसांमध्येच राहिला असता”.
बॉक्समध्ये ठेवण्यासाठी काही सापडत नव्हतं म्हणून क्रांतीच्या मुलींने स्वतःचे केस कापले. नशीबाने क्रांती वेळेवर पोहोचल्यामुळे तिच्या मुलीचे केस वाचले. हे करताना त्यांनी कात्री, बॉक्स, स्वतःचे जुने कपडे घेऊन ही योजना पुर्णत्वास आणण्याची तयारी केली होती. पण त्यांच्या आईने म्हणजेच क्रांतीने ही योजना मोडीस काढली. हा व्हिडिओ शेअर करत क्रांतीने याला कॅप्शन दिलं, ‘काय तर म्हणे बर्ड बॉक्स’.
सध्या हा व्हिडिओ बराच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांसह कलाकारांनाही हा व्हिडिओ आवडताना दिसत आहे. या व्हिडिओवर बऱ्याच कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत. तेजस्विनी पंडितने यावर कमेंट करत लिहिते, ‘मला असं वाटतं आपण सर्वांनी लहानपणी हे सगळं केलं असेल. मी तर केलं आहे. स्वतःचेच केस कापून टकल्या बाहुलीला ते चिकटवले आहेत. त्याची मिशी बनवून त्यांच्याशी खेळणं…go Chhabil! माफ कर क्रांती ताई’, असं लिहीत तेजस्विनीने आपल्या लहानपणीचा किस्सा शेअर केला. तर नेटकऱ्यांनीही भरभरून लाईक व कमेंटचा वर्षाव केला आहे. एक नेटकरी लिहीतो, ‘क्रांती मॅम तुम्ही एवढ्या व्यस्त असूनही किती वेळ देता मुलांसाठी! मॅम तुमचा खूप अभिमान वाटतो. खूप प्रेम!’, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘तुम्ही उशीरा आला असता तर छबील कशी दिसले असती याची मी कल्पना करु शकते’, अशी कमेंट केली आहे.