धकाधकीच्या जीवनात ताण कमी ठेवण्यासाठी मनोरंजन हे कायमच एक उत्तम माध्यम ठरले आहे,त्यात विनोदी रिऍलिटी शोचा मोठा वाटा आहे. आणि याच विनोदीशैलीमुळे अनेक विनोदवीर नावारूपाला आले.कॉमेडी हा विषय निघतो तेव्हा सगळ्यांचा लाडका दादूस अभिनेता अरुण कदम यांचं नाव आल्या शिवाय राहत नाही.त्यांचा तो आगरी कोळी लहेजा कायमच प्रेक्षकांना भावतो.सध्या महाराष्ट्रची हास्यजत्रा या शो मधून अरुण कदम त्यांच्या विनोदाच्या युनिक स्टाईलने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. (Arun Kadam Wife Complaint)
अरुण कदम त्यांच्या कामामुळे जितके लोकप्रिय आहे, तितकेच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही विशेष चर्चेत असतात. त्यांची पत्नी वैशाली कदम आणि मुलगी सुकन्या कदम या दोघी ही प्रेक्षकांना तितक्याच आपल्याशा वाटतात.अरुण कदम यांच्या पत्नीच्या सौंदर्यच विशेष कौतुक होताना पाहायला मिळत. एकमकेच्या कठीण काळात साथ देतो तो जोडीदार असतो असं म्हणतात.आणि म्हणूनच प्रत्येक कार्यक्रमात अरुण त्यांच्या पत्नीचं कौतुक करताना पाहायला मिळतात.
पाहा कोणती गोष्ट अरुण कदम यांच्या पत्नीला खटकते? (Arun Kadam Wife Complaint)
लग्न, संसार म्हंटल की जस कौतुक आलं तसंच जोडीदाराच्या तक्रारी ही येतातच असच इट्स मज्जाला दिलेल्या एका मुलाखतीत अरुण कदम यांच्या पत्नीला विचारण्यात आलं होत की तुम्हला अरुण कदम यांची कोणती गोष्ट आवडत नाही? तेव्हा वैशाली म्हणाल्या, अरुण त्यांच्या सोबत जाताना कधीच वेळेत येत नाहीत. त्यांनी जर वैशाली याना १ वाजताच वेळ दिला तर त्यांना माहित असत की ते चार वाजणार. पण हेच ते शूटच्या बाबतीत अगदी काटेकोर आणि वेळेत असतात. (Arun Kadam Wife Complaint)
अरुण कदम यांचं त्यांच्या मुली सोबतच बॉण्डिंग ही फार छान आहे.ही बाप लेकीची जोडी ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. नुकताच अरुण कदम यांच्या मुलीचं डोहाळेजेवण पार पडले.त्याचसोबत आजोबा अरुण कदम यांनी नातवंडांच्या स्वागताची तयारी सुरु केली आहे.
हे देखील वाचा : वडिलांच्या निधनानंतर आलेली ती वेळ निभावणं कठीण होत!तरीही भाऊ कदम थांबले नाहीत