झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या या कॉमेडी शो मधून घरघरात पोहचलेला विनोदवीर म्हणजे भाऊ कदम, भाऊ कदम यांनी आपल्या टॅलेंटच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं. तर भाऊ हे काही चित्रपटात देखील झळकले आहेत. तर त्यांची पांडू या चित्रपटातील हवालदाराच्या भूमिकेला चाहत्यांची चांगली पसंती मिळाली. तर यासोबत भाऊ कदम हे उत्तम विनोदी अभिनयासोबत ते उत्तम वादक आणि गायकही आहे.त्यांचे ही कला सादर करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच नेमका एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर पाहायला मिळतोय
पाहा भाऊ कदम यांचा व्हिडीओ (Bhau kadam, Tushar Deval)
चला हवा येऊ द्या हा शो अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. या शो मधील प्रत्येक कलाकाराची भूमिका ही चाहत्यांना आपलीशी वाटतेय. तसेच या सर्व कलाकारांमध्ये एक वेगळं बॉण्ड पाहायला मिळत असून हे सर्व कलाकार त्यांच्या सोशल मीडियावर एकमेकांसाठी पोस्ट लिहीत कौतुक करताना दिसून येतात. तर असाच या कार्यक्रमात ज्यांच्या म्युझिकच्या टाइमिंगवर चालतं तो म्हणजेच सर्वांचा लाडका वादक तुषार देवल , तर या तुषार देवल यांनी भाऊ कदम यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांचं कौतुक केलंय.(Bhau Kadam)
====
हे देखील वाचा – भलतीच डेरिंग! म्हणून अलका कुबल यांनी विहिरीत मारली उडी आणि रंजना यांचा खाल्लेला ओरडा…
====
तुषार देवल हे नेहमी स्वतःचे गायन,वादनाचे व्हिडीओ शेअर करतात पण आता त्यांनी भाऊ कदम यांचा व्हिडीओ शेअर कला या व्हिडिओत भाऊ हे ढोलकी वाजवताना दिसतात. तर तुषार हा हे मेहंदीच्या पानावर हे गाणं गात आहेत. जेव्हा भाऊ कदम मला ढोलकीची साथ देतात. असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला. तर भाऊंनी सादर केलेली ही कला चाहत्यांना खूप आवडली असून चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.(Bhau Kadam)

भाऊ कदमने रंगभूमीवरून त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने अनेक नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.जाऊ तिथे खाऊ हे त्याचे नाटक त्या काळात चांगलेच गाजले होते. या नाटकामुळे त्याच्या करियरला एक दिशा मिळाली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. भाऊने टाइमपास, टाइमपास २, फक्त लढ म्हणा, सांगतो ऐका, नारबाची वाडी, जाऊ द्या ना बाळासाहेब यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.