अखेर रत्नमालाचा पलटवार! वैदेही सानियाला शिकवला धडा

Bhagya Dile Tu Mala
Bhagya Dile Tu Mala

मालिका विश्वात अशा काही आघाडीच्या मालिका आहेत ज्या प्रेक्षक दररोजच्या आयुष्यात न चुकता पाहत असतात. आणि अशाच आघडीच्या मालिकांमध्ये एक नाव आवर्जून घेतलं ते म्हणजे कलर्स मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तू मला ही मालिका. या मालिकांमधील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकही भरभरून प्रेम करताना दिसतात. मालिकांच्या यादीतील भाग्य दिले तू मला या मालिकेवर देखील प्रेक्षकांचा भरभरून आशीर्वाद असल्याचं पाहायला मिळत. या मालिकेतील लोकप्रिय जोडी राज कावेरी म्हणजेच अभिनेत्री तन्वी मुंडले आणि अभिनेता विवेक सांगळे. त्यांच्या या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. (Bhagya Dile Tu Mala)

पहा काय घडलं आजच्या भागात (Bhagya Dile Tu Mala)

या जोडीप्रमाणे मालिकेतील इतर पात्रांनाही प्रेक्षक डोक्यावर उचलून घेत आहेत. मालिकेत राज कावेरी रत्नमाला यांच्यावर आलेल्या संकटाने मालिकेत टर्निंग पॉईंट आला होता. त्यांच्यावर आलेल्या आजारपंत त्या झुंज देताना पाहायला मिळाल्या दरम्यान मालिकेतून त्या निरोप घेणार का अशी शंका प्रेक्षकांना होती. त्यांना न मिळणारी किडनी आणि आजारपण यावरून या शक्यता अजूनच दाट झाल्या होत्या मात्र वैदेहीने राजला इमोशनल करून सर्व प्रॉपर्टी स्वतःच्या नावे करून रत्नमाला यांना किडनी दिलेली असते. दरम्यान त्यांच्यावरील हे संकट दूर झालं असलं तरी वैदेहीने वापरलेली स्ट्रॅटर्जी ही अत्यंत चुकीची होती आणि हे रत्नमालाला जेव्हा कळत तेव्हा रत्नमाला यांचा राग अनावर होतो.

भाग्य दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागात आज आपण पाहणार आहोत की, रत्नमालाने वैदेहीला नोटीस दिलेली असते. राजवर्धन मोहिते वर बळजबरी करून इस्टेट मिळवल्याप्रकरणी ही नोटीस देण्यात आलेली असते. ती नोटीस पाहून वैदेही खूप चिडते आणि जाब विचारायला रत्नमालाजवळ येते. आणि रत्नमाला ला विचारते माझे उपकार विसरून माझ्यावर केस केलीत तुम्ही. तुमची हिम्मत कशी झाली माझ्यावर केस करायची यावर रत्नमाला उत्तर देत म्हणते, माझी इस्टेट लुटायची तुझी हिम्मत झाली ना तशीच. (Bhagya Dile Tu Mala)

हे देखील वाचा – देशमुख कुटुंबासमोर ईशाने ठेवली अट,अनिरुद्ध मागणार अनिशची माफी?

यावर वैदेही राजची चूक असल्याचं सांगते त्यावर रत्नमाला राजची बाजू घेत सावरते. सानियाला बरोबर घेऊन रचलेल्या षडयंत्राला उपकार आणि दानाचं नाव देतेयस असं रत्नमाला वैदेहीला विचारते. तेव्हा सानिया चिडून आम्ही घाबरत नाही तुम्हाला. आम्ही सगळं मिळवलं काय करणार आहात तुम्ही असा उलट प्रश्न रत्नमालाला करते. आता रत्नमाला वैदेही सानियाला धडा शिकवून इस्टेट परत मिळवणार का हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Bhagya Dile Tu Mala Today Episode
Read More

राज कावेरी आणि वैदेहीच Reunion!सानियाला होणार अटक?

पोलीस सानिया पर्यंत पोहचणार का? सानिया विरोधात विधीने साक्ष दिल्यावर माहेरचा चहा रत्नमाला मोहिते आणि राज कावेरीला त्यांची पूर्ण प्रॉपर्टी परत मिळणार का?
Aai Kuthe Kay Karte Serial Today Episode
Read More

अरुंधती परतणार! आशुतोषला भावना अनावर अरुंधतीला मारली घट्ट मिठी

अरुंधतीच्या येण्यानं गोखले कुटुंब आनंदी तर देशमुख कुटुंब मध्ये संजना अनिरुद्धचा वाद सुरूच अरुंधती रागात म्हणाली मी कोणासाठी उपवास धरू या अनिरुद्ध साठी तर ते...... (Aai Kuthe Kay Karte Serial Today Episode)