अभिनेत्री हेमांगी कवी ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असते. मालिकांमधून हेमांगीने आजवर आपल्या अभिनयाची छाप सोडलीच आहे. मात्र हेमांगी अनेकदा सोशल मीडियावर तिचे बिनधास्तपणे मत मांडताना दिसते. चाहतेही तिचे या बिनधास्तपणाचे वेळोवेळी कौतुक करताना दिसतात. बरेचदा हे नेटकरी हेमांगीला ट्रोल करताना दिसतात, यामुळे ती चर्चेत ही आलेली आहे. (Hemangi Kavi Troll)
हेमांगी तिचे अनेक फोटोज आणि डान्सचे रील व्हिडीओज शेअर करत असते. अशातच हेमांगीच्या एका व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीय. हेमांगीने सोशल मीडियावर मेकअप करतानाचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओखाली हेमांगीने मेकअप करताना एक स्टेप विसरलीये ती कोणती हे सांगा असा प्रश्न केलाय.
पहा ट्रोल करणाऱ्यांना काय म्हणाली हेमांगी (Hemangi Kavi Troll)
हेमांगीच्या या व्हिडीओ पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव झालाय. यांत नेहमीप्रमाणे हेमांगीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलय. एका युजरने कामनेत करत लिहिलंय, Evdha makeup karun pan Kali disates???????? black Berry???????? असं म्हटलंय. यावर हेमांगीसोबत चाहत्यांनी कमेंट करत त्या कमेंट करणाऱ्या युजरला खडेबोल सुनावलेत. (Hemangi Kavi Troll)
एका युजरने कमेंट करत लिहिलंय, make up ka kadhich gora karanyasathi nasato he pahile samajun ghya. Je features asatat tyana highlight karanya sathi asato ani saval mhanje sundar nahi kiv yete tumachya vicharan var. get well soon यावर हेमांगीने ही कमेंट करत बाजू घेऊन बोलल्याबद्दल आभार व्यक्त केलेत.
हे देखील वाचा – अखेर रत्नमालाचा पलटवार! वैदेही सानियाला शिकवला धडा
हेमांगी स्पष्टव्यक्ती अभिनेत्री आहे. तिने पोस्ट केलेल्या व्हिडिओवर आजवर बऱ्याच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलय. मात्र यावर स्पष्टपणे भाष्य करत हेमांगीने वेळोवेळी उत्तर दिल. निवडक आणि लक्षवेधी भूमिका साकारणारी अभिनेत्री हेमांगी कवी तिच्या बेधडक स्वभावामुळे खऱ्या अर्थानेओळखली जाते. कोणत्याही विषयावर ती खुलेपणानं भाष्य करते म्हणून अनेकांच्या नजरेत तीच स्थान उंचावलेलं आहे तर काहींना हे पटत नाही. आजवर अनेक नाटकं, चित्रपट, मालिकांमध्ये केलेलं तिचं काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.