कलर्स मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तू मला ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत आलेल्या टर्निंग पॉईंटमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतेय. राज कावेरीच्या जोडीने तर सोशल मीडियावर धुमाकूळच घातला आहे. पडद्यासोबतच पडद्यामागेही या कलाकारांची धमाल मस्ती पाहणं रंजक ठरत. दरम्यान या मालिकेचा आणि मालिकेतील कथानकाचा चाहतावर्ग हा बराच मोठा आहे.(Bhagya Dile Tu Mala EPK)
भाग्य दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागात आज आपण पाहणार आहोत, आदित्य आणि सानिया बोलत असतात, आदित्य तेव्हा सानियाला म्हणतो की, केसचा निकाल उद्या आहे, आणि शिक्षा तर तुला होणारच असं म्हणून तिला घाबरवतो. आदित्यचं बोलणं ऐकून सानिया ही घाबरते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कावेरी हॉटेलवर येते तेव्हा रत्नमाला नाराज दिसतात, तेव्हा कावेरी त्यांना म्हणते आई काय झालं, तेव्हा रत्नमाला म्हणतात, केसचा निकाल काय लागला असेल त्याचाच विचार करतेय, राजचा ही अजून फोन आला नाही.
पाहा काय घडलं मालिकेच्या आजच्या भागात (Bhagya Dile Tu Mala EPK)
यावर कावेरी रत्नमाला यांची समजूत काढते. वैदेहीवरील हल्ल्याच्या केसचा आज निकाल असतो त्यामुळे सगळेचजण घाबरलेले असतात. तितक्यात राज आणि आदित्य तिथे येतात, तेव्हा त्यांच्याकडून केसच्या निकालाबद्दल कळत, त्यानंतर राज कावेरी आणि रत्नमाला यांना घेऊन माहेरच्या चहाच्या ऑफिसमध्ये येतो, कार मधून ते खाली उतरतात तेव्हा रत्नमाला आणि वैदेही यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय. तर सुदर्शन काकाचा चेहरा पाहण्यासारखा असतो. (Bhagya Dile Tu Mala EPK)
हे देखील वाचा – अरुंधती-आशुतोष जाणार हनिमूनला ?
तितक्यात सानिया आणि आकांशा आरतीचं ताट घेऊन येतात तेव्हा राज त्याच्याकडे पाहत म्हणतो, बघताय काय, आई आणि कावेरीचे पाय धुवा. हे ऐकल्यावर सानिया आणि आकांशा यांचा चेहरा पडतो. आता केसचा निकाल हा मोहितेंच्या बाजूने लागलेला कळतोय, नेमकं काय घडलंय हे जाणून घेणं मालिकेत रंजक ठरेल.
