नेहमी पडद्यावर कधी एकमेकांच्या सोबत तर कधी एकमेकांच्या विरोधात दिसणारे कलाकार हे खऱ्या आयुष्यात ही असेच असतील गरजेचं नसत. याचंच उत्तम उदाहरण पाहायचं असेल तर भाग्य दिले तू मला या मालिकेतील कलाकारांना पाहा. ऑनस्क्रीन पडद्यावरून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे कलाकार नुकतेच ऑफस्क्रीन ही एकत्र आले होते आणि या दरम्यानचे काही फोटोस आणि व्हिडिओज कलाकारांनी शेअर केले आहेत.(Bhagya Dile tu mala Team)
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर, पूर्व कौशिक, तन्वी मुंडले, सोबतच अभिनेता विवेक सांगळे, अमित रेखी हे मालिकेतील सर्व कलाकार एकत्र येऊन धमाल करताना पाहायला मिळाले, मालिकेत वैदेही आणि सानिया राज कावेरीच्या विरोधात दिसत असले तरी यांची ऑफस्क्रीन केमीस्ट्री देखील प्रेक्षकांना पाहायला आवडत आहे. कलाकारांनी पोस्ट केलेल्या या फोटो आणि व्हिडिओ वर चाहत्यांनी ही ‘ मस्त भाग्य दीले मला टीम’ , ‘Hum saath sath hey ‘ अशा अनेक कमेंट्स करत त्यांच्या मैत्रीचं कौतुक केलं आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
https://www.instagram.com/reel/CsiZh9ZJFGg/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
भाग्य दिले तू मला मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरताना पाहायला मिळते. मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं रत्नमाला हे पात्र आणि राज कावेरी म्हणजेच अभिनेता विवेक सांगळे आणि अभिनेत्री तन्वी मुंडले यांच्या सह सर्वच पात्र आपल्या दमदार अभिनयाने ही कथा प्रेक्षकांना पर्यंत पोहचवण्यात यशस्वी ठरत आहेत. राव कावेरीने सुरु केलेला बिझनेस देखील चॅन सुरु असून आता मालिकेत या दोघांवर कोणतं संकट येणार आणि हे दोघे त्या संकटनावर कशी मात करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.(Bhagya Dile tu mala Team)