शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता…’ फेम सोढीची भूमिका साकारणारा सुप्रसिद्ध अभिनेता दिल्ली विमानतळावरुन बेपत्ता, वडील म्हणाले, “घरी परतलाच नाही आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 26, 2024 | 5:35 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame actor Gurucharan Singh missing from Delhi airport

'तारक मेहता...' फेम सोढीची भूमिका साकारणारा सुप्रसिद्ध अभिनेता दिल्ली विमानतळावरुन बेपत्ता, वडील म्हणाले, "घरी परतलाच नाही आणि..."

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग दिल्लीतून बेपत्ता झाला असल्याचे वृत्त समोर येत आहे. हा अभिनेता दिल्ली विमानतळावरून बेपत्ता झाला होता. विमानतळावरून तो मुंबईला जात असल्याची माहिती मिळाली, मात्र, तो मुंबईला पोहोचला नाही आणि घरीही परतला नाही.

याबद्दल गुरुचरणच्या वडिलांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. ETimes TV ला अभिनेता बेपत्ता असण्यासंदर्भातील तक्रारीची डिजिटल प्रत मिळाली आहे, जी हिंदीत छापण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये असं लिहिलं आहे की, “माझा मुलगा गुरुचरण सिंग, वय वर्षे : ५० वर्षे, २२ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता मुंबईला जाण्यासाठी निघाला होता. तो विमान पकडण्यासाठी विमानतळावर पोहोचला होता”.

View this post on Instagram

A post shared by Gurucharan Singh official (@sodhi_gcs)

आणखी वाचा – किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज, कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

यापुढे यात असं म्हटलं आहे की, “तो विमानतळावर गेला होता. मात्र तो मुंबईला पोहोचला नाही आणि पुन्हा घरीही परतला नाही. त्याचा फोनद्वारेही काही संपर्क होत नाही. तो बेपत्ता झाला आहे. तो मानसिकदृष्ट्या स्थिर आहे आणि आम्ही त्याचा शोध घेत आहोत.”

आणखी वाचा – “त्यांचा शेवटचा कॉल मी उचलला नाही आणि…”, ऋषी कपूर यांच्या निधनापूर्वी घडलेल्या ‘त्या’ घटनेबाबत लेकीचा खुलासा, म्हणाली, “रुग्णालयामध्ये…”

दरम्यान, त्यांच्या अचानक बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने मनोरंजन सृष्टीसह त्यांच्या अनेक चाहत्यांमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर त्यांचे अनेक चाहते सध्या चिंतेत आहेत. त्यांनी तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत रोशन सिंग सोढीची भूमिका साकारली होती. मात्र वडिलांच्या तब्येतीच्या समस्येमुळे त्यांनी ही मालिका सोडली होती. त्या काळात त्याला त्याच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करायचे होते.

Tags: Gurucharan Singh MissingGurucharan Singh NewsTaarak Mehta ka ooltah chashma
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
rekha kissed on richa chaddha baby bump

Video : गरोदर अभिनेत्रीच्या पोटाला रेखा यांनी भर कार्यक्रमात केलं किस, उपस्थितही बघतच बसले अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.