चित्रपटात आपण एखादा सीन पाहताना जेवढा आनंद होतो कलाकारासाठी ते तेवढच अवघड असत तो सीन पडद्यावर साकारणं. बऱ्याचदा एखादा अवघड सीन शूट करताना कलाकार डगमगला असेल असं वाटत पण फक्त ऍक्शन सीनच नाहीतर एखादा किसिंग सीन करताना ही एखादा कलाकार डगमगू शकतो. याच एक उदाहरण नुकताच अभिनेत्री रसिका सुनील ने शेअर केली आहे. रसिक सुनील, सुयोग्य गोरे, हेमंत ढोमे, अनुजा साठे या कलाकारांची प्रमुख भूमिका असलेला फकाट हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने रसिक सुनील ने चित्रपटातील किसिंग सीन दरम्यानचा एक किस्सा शेअर केला आहे.(Rasika Sunil Suyog Kissing scene)
चित्रपटात सुयोगला रसिकाला किस करायचे होते. मात्र असा सिन करण्याकरता तो खूप अनकम्फर्टटेबल झाला होता. हा सीन करणे सुयोगला खूपच अवघड जात होते, कारण यापूर्वी त्याने किसिंग सीन कधीच केला नव्हता. मात्र या सगळ्यात त्याला त्याचीच सहकलाकार रसिका सुनीलने साथ दिली आणि अखेर तो सीन चित्रित झाला.
आणि किसिंग सीन शूट करताना..
सीनबद्दल पुढे रसिका सुनील म्हणते, ” असा सीन करायचा आहे हे जेव्हा सुयोगला कळले, तेव्हा तो खूप घाबरला कारण आधी त्याने असा सीन कधीच दिला नव्हता. मी हा सीन कारण्यासाठी कम्फर्टटेबल होते. मला काहीच अडचण नव्हती. पण सुयोगला हे जरा विचित्र वाटत होतं. त्याला मी सांगितलं आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत आणि कामाच्या बाबतीत प्रोफेशनलही आहोत, त्यामुळे हा सीन करायला तुला एवढं अनकम्फर्टटेबल व्हायची गरजच नाही. तेव्हा आमच्या दोघांचं लग्नही झालं नव्हतं. तरीही त्याला हे करायला खूप दडपण येत होतं. अखेर मी आणि दिग्दर्शक श्रेयश जाधवने भरपूर समजवल्यानंतर किसिंग सीन देण्यासाठी तो तयार झालो आणि हा सीन चित्रित झाला.
हे देखील वाचा – कॅमेरामॅनच्या त्या कृत्याने अशोक सराफचे ‘अशोक मामा’ झाले..अशोक सराफ यांना असं पडलं मामा हे नाव
आता आमच्या दोघांचंही लग्न झालं आहे. मला बऱ्याच जणांनी विचारलं तू किसिंग सीन दिलास तुझा नवरा तुला काही बोलला नाही. त्यावर मी एकच सांगेन, माझं क्षेत्र काय आहे, हे माझ्या नवऱ्याला माहित आहे. त्यामुळे इथे भूमिकेची गरज म्हणून हे सगळं करावं लागतं. याची त्याला पूर्ण कल्पना आहे.”(Rasika Sunil Suyog Kissing scene)