हिंदी सिनेसृष्टीतील ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. उत्तम कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. महिलावर्गामध्ये ही मालिका विशेष लोकप्रिय असल्याचे दिसून आले आहे. मालिकेसह कलाकारदेखील चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. मालिकेत अंगूरी ही पात्र अभिनेत्री शुभांगी अत्रेने साकारले आहे. शुभांगी ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अनेकदा ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अशातच तिच्यासंदर्भात एक नवीन बातमी समोर आली आहे. (Shubhangi Atre Talk About His Divorce)
लग्नाच्या १९ वर्षांनंतर पती पियुष पुरेपासून विभक्त झालेल्या शुभांगीने त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केले आहे. यावेळी तिने असे म्हटले आहे की, “मी सध्या माझ्या कामाबद्दल खूप गंभीर आहे आणि आता मी फक्त माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. माझ्यासाठी हा प्रवास खूप खडतर होता. आमच्या नात्यात अनेक चढ-उतार आले. माझे लग्न वयाच्या २०व्या वर्षी झाले होते आणि हे माझ्यासाठी सोपे नव्हते. त्यामुळे भविष्यात मी आता प्रेमाला दुसरी संधी देईन असं मला वाटत नाही. मी माझ्या कामालाच माझे जोडीदार बनवले आहे. तसेच माझ्या आयुष्यात मी आता नात्याचे दरवाजे पूर्णपणे बंद केले आहेत.”

शुभांगी व पियुष यांचा प्रेमविवाह झाला असून घरच्यांपासून पळून जात त्यांनी कोर्टात लग्न केले होते. त्यांच्या विवाहिक आयुष्यात अनेक समस्या होत्या. त्यामुळे त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांना एक् मुलगीदेखील आहे. त्यांनी त्यांच्या नात्याला खूप वेळ दिला. पण त्यांच्या नात्यातले मतभेद ते मिटवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.
११ एप्रिल १९८१ रोजी इंदूरमध्ये जन्मलेल्या शुभांगीने ‘कसौटी जिंदगी की’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिने ‘कस्तुरी’मध्ये काम केले. ‘कस्तुरी’द्वारे तिला खूप लोकप्रियता मिळाली. आणि त्यानंतर ती छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध चेहरा बनली. ‘कुमकुम’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘हवन’, ‘बिग बॉस ५’, ‘चिडिया घर’ यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.