सुरवातीच्या काळात कलाकरांच्या वजनाची चर्चा होत नसे. बरेचदा हे कलाकार त्यांच्या जास्त असलेल्या वजनामुळे ओळखले जायचे. तेव्हा फिटनेसची ही तशी क्रेज नसल्याने वजन कमी करण्यासाठी कलाकार प्रयत्नही करताना दिसत नसत. मात्र आता हे चित्र बदललेलं आहे. अनेक कलाकारांनी त्यांचं वजन कमी करत चाहत्यांना धक्का दिला आहे. ही कलाकार मंडळी स्वतःच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसत आहेत. अशी बरीच कलाकार मंडळी आहेत ज्यांनी फिटनेसकडे लक्ष देऊन वजन घटवलं आहे. (Aartii Solanki Post)
अशातच काही दिवसांपासुन मराठी मनोरंजन विश्वातील एका अभिनेत्रीच्या वजनाची चर्चा सुरु होती. ही अभिनेत्री आहे आरती सोलंकी. तब्बल ५० किलो वजन कमी करत या अभिनेत्रीने एकप्रकारे रेकॉर्डच ब्रेक केला आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आरतीने स्वतःमध्ये केलेल्या या बदलामुळे तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. नाटक, मराठी चित्रपट, मालिका यांमधून आजवर आरतीने तिच्या अभिनयाची छाप सोडली.
वजन कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या प्रवासात तिला अनेक अडचणी आल्या. मात्र खचून न जाता अगदी जिद्दीने तिने तिचा हा प्रवास पूर्ण केला. याबाबतची ऑफिशिअल पोस्ट तिने सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केली होती. यानंतर आरतीने शेअर केलेल्या आणखी एका इन्स्टाग्राम पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आरतीने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये आरतीने मिरर सेल्फी काढलेला पाहायला मिळत आहे. या फोटोसह कॅप्शन देत “थोडासा कॉन्फिडन्स आला आहे स्वतःबद्दल म्हणून मिरर फोटो काढला आहे” असं तिने म्हटलं आहे.
अनेकदा कलाकारांना त्यांच्या वजनावरून ट्रोल केलं जातं. या ट्रोलिंगच्या सामन्यात आरती सोळंकीही अडकली आहे. मात्र आरतीने या ट्रोलिंगला उत्तर देत थेट वजन कमी केलेलं पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोमध्येही आरतीचा हटके अंदाज पाहायला मिळाला.