शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

२०व्या वर्षी लग्न, १९ वर्षांचा संसार मोडला अन्…; घटस्फोटानंतर सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “प्रेमाला दुसरी संधी देईन असं…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 14, 2023 | 4:20 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
bhabi ji ghar par hai fame actress shubhangi atre give statement on her divorce from husband

२०व्या वर्षी लग्न, १९ वर्षांचा संसार मोडला अन्…; घटस्फोटानंतर सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "प्रेमाला दुसरी संधी देईन असं…"

हिंदी सिनेसृष्टीतील ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. उत्तम कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. महिलावर्गामध्ये ही मालिका विशेष लोकप्रिय असल्याचे दिसून आले आहे. मालिकेसह कलाकारदेखील चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. मालिकेत अंगूरी ही पात्र अभिनेत्री शुभांगी अत्रेने साकारले आहे. शुभांगी ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अनेकदा ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अशातच तिच्यासंदर्भात एक नवीन बातमी समोर आली आहे.  (Shubhangi Atre Talk About His Divorce)

लग्नाच्या १९ वर्षांनंतर पती पियुष पुरेपासून विभक्त झालेल्या शुभांगीने त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केले आहे. यावेळी तिने असे म्हटले आहे की, “मी सध्या माझ्या कामाबद्दल खूप गंभीर आहे आणि आता मी फक्त माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. माझ्यासाठी हा प्रवास खूप खडतर होता. आमच्या नात्यात अनेक चढ-उतार आले. माझे लग्न वयाच्या २०व्या वर्षी झाले होते आणि हे माझ्यासाठी सोपे नव्हते. त्यामुळे भविष्यात मी आता प्रेमाला दुसरी संधी देईन असं मला वाटत नाही. मी माझ्या कामालाच माझे जोडीदार बनवले आहे. तसेच माझ्या आयुष्यात मी आता नात्याचे दरवाजे पूर्णपणे बंद केले आहेत.”  

आणखी वाचा – पूजा हेगडेला जीवे मारण्याची धमकी, प्रकरण नेमकं काय?, अभिनेत्रीची टीम स्पष्टीकरण देत म्हणाली, “धमकी मिळाली असल्याचं…”

शुभांगी व पियुष यांचा प्रेमविवाह झाला असून घरच्यांपासून पळून जात त्यांनी कोर्टात लग्न केले होते. त्यांच्या विवाहिक आयुष्यात अनेक समस्या होत्या. त्यामुळे त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांना एक् मुलगीदेखील आहे. त्यांनी त्यांच्या नात्याला खूप वेळ दिला. पण त्यांच्या नात्यातले मतभेद ते मिटवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.  

आणखी वाचा – Video : वांद्रेमध्ये रस्त्याशेजारी वडापाव-भजीपाव खाताना अश्विनी भावेंना भलताच आनंद, व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, “पाटीलचा वडापाव…”

११ एप्रिल १९८१ रोजी इंदूरमध्ये जन्मलेल्या शुभांगीने ‘कसौटी जिंदगी की’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिने ‘कस्तुरी’मध्ये काम केले. ‘कस्तुरी’द्वारे तिला खूप लोकप्रियता मिळाली. आणि त्यानंतर ती छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध चेहरा बनली. ‘कुमकुम’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘हवन’, ‘बिग बॉस ५’, ‘चिडिया घर’ यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Tags: bollywoodbollywood newsentertainmententertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Aartii Solanki Post

आरती सोळंकीचा वजन कमी करण्याचा निर्णय ठरला यशस्वी, स्वतःच मिरर सेल्फी काढत शेअर केला फोटो, म्हणाली, "स्वतःबद्दल…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.