शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध बंगाली अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचे निधन, वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 19, 2024 | 10:15 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Bengali actress Uma Dasgupta passed away at the age of 84 due to cancer in Kolkata

बंगाली अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचे निधन, कर्करोगामुळे वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास

चित्रपटसृष्टीतून अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. ती म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या ‘पाथेर पांचाली’ या चित्रपटातील ‘दुर्गा’ यांचं निधन झालं आहे. उमा दासगुप्ता यांच्या निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली असून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी कोलकाता येथे निधन झाले. १८ नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन झाले. अनेक वर्षांपासून त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांचे नातेवाईक, अभिनेते आणि राजकारणी चिरंजीत चक्रवर्ती यांनी दुजोरा दिला आहे. (Uma Dasgupta Passed Away)

अभिनेता आणि खासदार चिरंजीत चक्रवर्ती यांनी अभिनेत्रीच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. उमा दासगुप्ता यांच्या मुलाने चिरंजीत चक्रवर्ती यांना त्यांच्या आईच्या निधनाची माहिती दिली आहे. उमा दासगुप्ता यांच्या निधनाने चिरंजीत चक्रवर्ती यांनाही दु:ख झाले आहे. याशिवाय टीएमसी खासदार आणि लेखक कुणाल घोष यांनीही उमा दासगुप्ता यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – 19 November Horoscope : मेष, धनू व कुंभ राशीच्या लोकांना मंगळवारी होणार आर्थिक लाभ, अधिक जाणून घ्या…

उल्लेखनीय आहे की उमा दासगुप्ता यांनी त्यांच्या ‘पाथेर पांचाली’ या चित्रपटात अशी भूमिका साकारली होती, जी आजही लोकांच्या मनात घर करून आहे. या चित्रपटात ही अभिनेत्री ‘दुर्गा’च्या भूमिकेत दिसली होती आणि तिने चित्रपटात अपूच्या मोठ्या बहिणीची भूमिका केली होती. मात्र, त्यानंतर ती पुन्हा पडद्यावर दिसली नाही. आपल्या पहिल्याच चित्रपटाने लोकांची मने जिंकणाऱ्या उमा यांनी स्वत:ला इंडस्ट्रीपासून दूर केले आणि ती कधीही कोणत्याही चित्रपटात दिसली नाही.

आणखी वाचा – मित्रांचा कल्ला, भावनिक क्षण अन्…; लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त प्रसाद-अमृताने पहिल्यांदाच शेअर केला Unseen Video

उमा दास गुप्ता लहानपणापासूनच थिएटरमध्ये सहयोगी होत्या. त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक हे दिग्दर्शक सत्यजित रे यांचे मित्र होते. मागील काही दिवसांपासून उमा दासगुप्ता यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. सर्वांच्या हृदयावर राज्य करणारी उमा आता आपल्यात नसल्या तरी त्यांची व्यक्तिरेखा लोकांच्या हृदयात कायम जीवंत राहतील.

Tags: Bengali ActressUma DasguptaUma Dasgupta Passed Away
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Paaru Marathi Serial Update

Paaru Marathi Serial : अनुष्का-आदित्यच्या लग्नाची खोटी बातमी समोर, अहिल्यादेवींना बसला मोठा धक्का, चर्चांवर काय उत्तर देणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.