Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे मारुती पारुसाठी खास भेटवस्तू म्हणून गजरा घेऊन येतो. पारू आनंदाने तो गजरा माळते आणि सुंदर असा लूक करुन जास्वंदाचं फुल घेऊन आदित्यच्या रूममध्ये जाते. आदित्यला उठवताना ओ धनी उठा असंही ती म्हणते. त्यानंतर ती आदित्य झोपेतून जागा होत आहे हे पाहून लगेच गुड मॉर्निंग असे म्हणते. त्यानंतर आदित्यला ती विचारते, तुम्हाला एक विचारायचं होतं. तुम्हाला कोणती मुलगी आवडली आहे का?, यावर आदित्य गमतीत म्हणतो की, ‘माझं तर तुझ्याशी लग्न झालं आहे. त्यामुळे मला कोणती मुलगी कशी आवडू शकते’. हे ऐकल्यावर पारूला धक्काच बसतो.
त्यानंतर आदित्य स्वतः सांगतो की, मी तर गंमत करत होतो. तू इतकी सिरीयस कशाला होत आहेस. त्यानंतर आदित्यला उशीर झालेला असतो म्हणून तो घाई- घाईत तयारी करायला जातो. पारू खाली येत असतानाच दामिनी तिला अडवते आणि तिच्या केसातला गजरा काढून घेते आणि तो गजरा ती प्रियाला देते आणि सांगते की, ‘मी स्वतः तुझ्यासाठी हा गजरा आणला आहे. तू तुझ्या केसात हा गजरा माळ’, हे ऐकल्यावर प्रिया सुद्धा खुश होते. त्यानंतर पारू व प्रिया सगळ्यांसाठी चहा घेऊन येतात. प्रिया सगळ्यांना चहा देत असते तेव्हा दामिनी तिला टोकते आणि म्हणते की, ‘तू या घराची सून आहेस त्यामुळे नोकर माणसं आहेत चहा देण्यासाठी.
आणखी वाचा – 19 November Horoscope : मेष, धनू व कुंभ राशीच्या लोकांना मंगळवारी होणार आर्थिक लाभ, अधिक जाणून घ्या…
तू आता बसून निवांत चहा पी’. हे ऐकल्यावर अहिल्यादेवी म्हणतात की, ‘हो तू या घराची नवी सून आहे त्यामुळे तू आता इथं बसून चहा पी. पारुला नाश्ता लावायला दामिनी स्वतः मदत करेल. असंही तिला घरातल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी माहित आहेत’. हे ऐकल्यावर दामिनीचा चेहराच पडतो. त्याच वेळेला आदित्य खाली आलेला असतो. तेव्हा अहिल्यादेवी आदित्यला विचारतात, ‘तुला काल मी दाखवल्यापैकी एक तरी मुलगी आवडली आहे का?, तसं पुढे बोलायला’. यावर आदित्य मीटिंगचं कारण सांगून निघून जातो आणि सांगतो की, आपण या विषयावर नंतर बोलू. पारुला आदित्यने त्या डोळ्यांबाबत सांगितलेलं असतं. त्या बोलक्या डोळ्यांची मुलगीच मला लग्नासाठी हवी आहे असं आदित्य पारूला सांगतो. तेव्हा पारू आदित्यला वचन देते की, ‘मी ही डोळे असणारी मुलगी तुम्हाला शोधून दाखवीन’.
आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, अनुष्का व आदित्य यांच्या लग्नाची बातमी पेपरमध्ये छापून आलेली असते. हे ऐकून अहिल्या देवींना धक्काच बसतो. तर दामिनी मुद्दाम मध्ये मध्ये करत हे प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न करते. आता अनुष्का आणि आदित्य यांच्या लग्नाबाबत आहिल्यादेवी माध्यमांना काय सांगणार हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.