‘बिग बॉस’ हिंदी किंवा ‘बिग बॉस’ मराठी… प्रत्येक सीझनमध्ये एक तरी अशी लव्हस्टोरी असते जी प्रेक्षकांच्या लक्षात राहते. पण अशा फार कमी जोड्या आहेत, ज्यांनी ‘बिग बॉस’चा हा खेळ संपल्यानंतरही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. तर अशी पहिली जोडी जिने ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी त्यांचं नातं टिकवलं आणि निभावलंही. ती म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख ही जोडी. गेल्या वर्षी १८ नोव्हेंबर रोजी या दोघांनी एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली आणि नुकतंच त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. लग्नाचा पहिला वाढदिवस प्रत्येक नवविवाहित जोडप्यासाठी खास असतो. याच खास दिवसाचे औचित्य साधत प्रसाद-अमृता यांनी त्यांच्या लग्नाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. (Prasad Jawade Amruta Deshmukh Wedding Anniversary)
अमृताने तिच्या युट्युब चॅनलवर लग्नाच्या खास क्षणांचा व्हिडीओ आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. या व्हिडीओमधून प्रसाद-अमृता यांनी त्यांच्या हटके लव्हस्टोरीची सुरुवात आणि त्यांचा लग्नपर्यंतचा एकूण प्रवास या व्हिडीमधून दाखवला आहे. व्हिडीओमध्ये प्रसाद-अमृता यांच्या संगीत, हळदी व विवाह सोहळ्याची खास झलक पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये प्रसाद-अमृता यांच्या मित्रमैत्रिणींचा कल्ला, धमाल, मजामस्ती असं सगळंच पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर हळदीच्या क्षणी अमृता काहीशी भावुक झाल्याचेही दिसत आहे. संगीत सोहळ्यात प्रसादनेही आपल्या मित्रमंडळींबरोबर हटके डान्स केला.
आणखी वाचा – 19 November Horoscope : मेष, धनू व कुंभ राशीच्या लोकांना मंगळवारी होणार आर्थिक लाभ, अधिक जाणून घ्या…
त्यानंतर लग्न प्रसंगीही दोघे खूप सुंदर दिसत होते आणि त्याक्षणी एकमेकांना पाहून दोघेही आनंदी दिसत होते आणि याचीच खास झलक या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. यावेळी दोघांनी एकमेकांसाठी हटके उखाणेही घेतले. या हटके उखण्यांची झलक या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आली आहे. अमृताबरोबर लग्न करताना प्रसादला हे सगळं स्वप्नवत वाटल्याची भावना त्याने या व्हिडीओमधून व्यक्त केली आहे. त्याचबरोबर लग्नाच्या वेळी प्रसाद अमृताला लग्नाच्या लूक मध्ये पाहण्यासाठी खूपच उत्सुक होता हेदेखील या व्हिडीओमधून दिसत आहे. दोघांच्या लग्नाला मनोरंजन विश्वातील अनेकांनी हजेरी लावली होती.
abऋतुराज शिंदे, ओंकार राऊत, अपूर्व रांजणकर, आशुतोष गोखले, शुभंकर तावडे, रसिका वेंगुर्लेकर, रश्मी अनपट, रेशम, हर्षदा खानविलकर तसंच सिद्धार्थ जाधव आणि अनेक कलाकार प्रसाद-अमृता यांच्या लग्नात उपस्थित होते. एकूणच प्रसाद-अमृता यांच्या लग्नातील खास क्षणांचा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे या व्हिडीओला प्रतिसादही दिला आहे. दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर अमृता सध्या नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, तर प्रसाद ‘पारू’ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.