अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्या नावाला योग्य ते स्थान महेश कोठारेंनी कसं मिळवून दिलं, याबाबत एका मुलाखतीत लक्ष्मीकांत यांनी सांगितलं होतं. नेमका काय आहे तो किस्सा जाणून घेऊया आजच्या ‘जपलं ते आपलं’ या भागात. (Lakshmikant Berde Struggle Story)
सिनेमासृष्टीत अभिनेते महेश कोठारे व अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सिनेमांचे अनेक चाहते आहेत. यांच्या पडद्यावरील मैत्रीप्रमाणे त्यांची पडद्यामागेही मैत्री घट्ट होती याचे अनके किस्से आहेत. ‘लेक चालली सासरला’, ‘धुमधडाका’ यांसारख्या अनेक चित्रपटात महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरलं. लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव मोठं करण्यात महेश कोठारे यांचा खारीचा वाटा आहे, याबद्दल लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ‘दूरदर्शन सह्याद्री वाहिनी’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितलं होत. नेमका काय आहे तो किस्सा याबद्दल जाणून घेऊया आजच्या ‘जपलं ते आपलं’ या भागात.
पाहा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्या यशाचं क्रेडिट कोणाला दिलं (Lakshmikant Berde Struggle Story)
महेश कोठारे यांच्याबद्दल बोलताना लक्ष्मीकांत यांनी म्हटलं होतं की, “‘हसली ती फसली’ हा माझा पहिला साईन केलेला चित्रपट. तर पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट ‘लेक चालली सासरला’. माझा पहिला चित्रपट सिल्वर जुबली झाला आणि याच चित्रपटामुळे मला खऱ्या अर्थाने नाव मिळालं. मला चित्रपटामुळे नाव मिळालं याच क्रेडिट मी फक्त महेश कोठारेला देईन. त्यानंतर ‘धुमधडाका’ हा चित्रपट गोल्डन जुबली झाला. ‘धुमधडाका’ चित्रपटामुळे आणि चित्रपटातील माझ्या भूमिकेमुळे मला महाराष्ट्रात चार लोकं ओळखू लागले. ‘धुमधडाका’चा किस्सा असा आहे की, आम्ही ‘झोपी गेलेला जागा झाला’ हे नाटक करत होतो, आणि त्यावेळेला मला महेशने शब्द दिला होता की, जेव्हा केव्हा मी चित्रपट बनवेन तेव्हा मी तुलाच पहिल्यांदा साईन करणार”.
“हे जेव्हा तो बोलला तेव्हा माझी आणि त्याची पहिलीच ओळख होती. त्याची आई माझ्यासोबत नाटकांत व्हिलनचं काम करत होती. त्यावेळेला महेश व माझी भेट झाली. माझं काम पाहून महेश खूप खुश झाला होता. त्याचवेळी त्याने चित्रपटात मला घ्यायचं ठरवून टाकलं होत. ‘लेक चालली सासरला’ चित्रपटाच्या वेळी या गोष्टी घडत गेल्या. महेश काही आपला शब्द विसरला नाही. त्यावेळी तितकसं माझं सिनेसृष्टीत नाव ही नव्हतं, मला घेऊन चित्रपट करणं ही त्याच्यासाठी एक प्रकारची रिस्कचं होती. पण यांत तो यशस्वी ही झाला.

एकूणच लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव मोठं करण्यात वा या नावाची सर्वत्र ओळख करून देण्यात अभिनेते महेश कोठारे यांनी पुढाकार घेतला. अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयालाही तोड नाही. त्यांच्या अभिनयामुळेच त्यांना त्यांच्या कामाची योग्य ती पोचपावती मिळाली, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.