रविवार, ऑक्टोबर 1, 2023
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Home - लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या यशाचं क्रेडिट देत म्हटलं होत, “मला नाव मिळालं याच क्रेडिट मी…”

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या यशाचं क्रेडिट देत म्हटलं होत, “मला नाव मिळालं याच क्रेडिट मी…”

Sneha GaonkarbySneha Gaonkar
ऑगस्ट 15, 2023 | 8:28 am
in Trending
Reading Time: 1 min read
Lakshmikant Berde Struggle Story

Lakshmikant Berde Struggle Story

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्या नावाला योग्य ते स्थान महेश कोठारेंनी कसं मिळवून दिलं, याबाबत एका मुलाखतीत लक्ष्मीकांत यांनी सांगितलं होतं. नेमका काय आहे तो किस्सा जाणून घेऊया आजच्या ‘जपलं ते आपलं’ या भागात. (Lakshmikant Berde Struggle Story)

सिनेमासृष्टीत अभिनेते महेश कोठारे व अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सिनेमांचे अनेक चाहते आहेत. यांच्या पडद्यावरील मैत्रीप्रमाणे त्यांची पडद्यामागेही मैत्री घट्ट होती याचे अनके किस्से आहेत. ‘लेक चालली सासरला’, ‘धुमधडाका’ यांसारख्या अनेक चित्रपटात महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरलं. लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव मोठं करण्यात महेश कोठारे यांचा खारीचा वाटा आहे, याबद्दल लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ‘दूरदर्शन सह्याद्री वाहिनी’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितलं होत. नेमका काय आहे तो किस्सा याबद्दल जाणून घेऊया आजच्या ‘जपलं ते आपलं’ या भागात.

पाहा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्या यशाचं क्रेडिट कोणाला दिलं (Lakshmikant Berde Struggle Story)

महेश कोठारे यांच्याबद्दल बोलताना लक्ष्मीकांत यांनी म्हटलं होतं की, “‘हसली ती फसली’ हा माझा पहिला साईन केलेला चित्रपट. तर पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट ‘लेक चालली सासरला’. माझा पहिला चित्रपट सिल्वर जुबली झाला आणि याच चित्रपटामुळे मला खऱ्या अर्थाने नाव मिळालं. मला चित्रपटामुळे नाव मिळालं याच क्रेडिट मी फक्त महेश कोठारेला देईन. त्यानंतर ‘धुमधडाका’ हा चित्रपट गोल्डन जुबली झाला. ‘धुमधडाका’ चित्रपटामुळे आणि चित्रपटातील माझ्या भूमिकेमुळे मला महाराष्ट्रात चार लोकं ओळखू लागले. ‘धुमधडाका’चा किस्सा असा आहे की, आम्ही ‘झोपी गेलेला जागा झाला’ हे नाटक करत होतो, आणि त्यावेळेला मला महेशने शब्द दिला होता की, जेव्हा केव्हा मी चित्रपट बनवेन तेव्हा मी तुलाच पहिल्यांदा साईन करणार”.

हे देखील वाचा – ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ मालिकेतून अभिनेते गिरीश ओक करणार छोट्या पडद्यावर पुनरागमन, साकारणार ‘ही’ भूमिका, प्रोमो समोर

“हे जेव्हा तो बोलला तेव्हा माझी आणि त्याची पहिलीच ओळख होती. त्याची आई माझ्यासोबत नाटकांत व्हिलनचं काम करत होती. त्यावेळेला महेश व माझी भेट झाली. माझं काम पाहून महेश खूप खुश झाला होता. त्याचवेळी त्याने चित्रपटात मला घ्यायचं ठरवून टाकलं होत. ‘लेक चालली सासरला’ चित्रपटाच्या वेळी या गोष्टी घडत गेल्या. महेश काही आपला शब्द विसरला नाही. त्यावेळी तितकसं माझं सिनेसृष्टीत नाव ही नव्हतं, मला घेऊन चित्रपट करणं ही त्याच्यासाठी एक प्रकारची रिस्कचं होती. पण यांत तो यशस्वी ही झाला.

हे देखील वाचा – सनी देओलच्या ‘गदर २’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमााई, आतापर्यंत कमावले तब्बल इतके कोटी

एकूणच लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव मोठं करण्यात वा या नावाची सर्वत्र ओळख करून देण्यात अभिनेते महेश कोठारे यांनी पुढाकार घेतला. अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयालाही तोड नाही. त्यांच्या अभिनयामुळेच त्यांना त्यांच्या कामाची योग्य ती पोचपावती मिळाली, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

Tags: entertainmentjapal te apallakshmikant berdesuccess story

Latest Post

Parineeti-Raghav Pre Wedding Rituals
Bollywood Gossip

राघवचा फटका, परिणितीचा उत्साह अन्…, शाही विवाहापूर्वी चोप्रा व चड्ढा कुटुंबियांमध्ये रंगला क्रिकेटचा सामना, फोटो व्हायरल

ऑक्टोबर 1, 2023 | 7:13 pm
Aarya Ambekar sings a song for Chandramukhi 2 film
Marathi Masala

“असा अनुभव तुम्हाला आला?” प्रसिद्ध मराठमोळ्या गायिकेने गायलं कंगना रानौतच्या चित्रपटासाठी गाणं, अभिनेत्रीने केली कमेंट, म्हणाली, “शेवटी तू…”

ऑक्टोबर 1, 2023 | 6:09 pm
Rutuja Bagwe Mazya Gharachi Goshta
Television Tadka

“आईच्या इच्छेखातर…” ऋतुजा बागवेला नवीन घर घेण्यास तिच्या आई-वडिलांनी दिला होता पाठिंबा, म्हणाली, “माझ्या बाबांनी मला…”

ऑक्टोबर 1, 2023 | 4:57 pm
Bollywood Movies Week 1 Box Office Collection
Bollywood Gossip

‘फुकरे ३’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड; ‘द वॅक्सिन वॉर’, ‘चंद्रमुखी २’ला मागे टाकत तीन दिवसांत केली इतकी कमाई

ऑक्टोबर 1, 2023 | 1:30 pm
Next Post
Ashok Saraf on Sachin Pilgaonkar

श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी अशोक सराफ का गाठायचे पिळगांवकरांचं घर, म्हणाले, "त्याचे वडील…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist