अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही सिनेसृष्टीतील एक जाणकार आणि आदर्श जोडी आहे. अनेक कलाकार जोड्यांची मुलं देखील आपल्याला आई वडीलांच्या पाठोपाठ सिनेसृष्टीत पदार्पण करताना पहायला मिळत आहेत. परंतु अशोक मामा आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत सराफ हा मात्र सिनेसृष्टीपासून लांब आहे.अनिकेत एक शेफ आहे. निक शेफ या नावाने तो युट्यूब वर व्हिडिओ देखील करतो. (Aniket Saraf Birthday)
अनिकेतचा शेफ होण्याचा प्रवास अशोक मामानी सांगितला आहे. अशोक मामा म्हणाले, शेफ होण्याचा निर्णय अनिकेतनं स्वत:च घेतला. त्याला ज्यात रस आहे ते त्यानं करावं असं अशोक मामा आणि निवेदिता सराफ या दोघांचंही म्हणणं होतं. त्याला लिखाणात इंटरेस्ट होता. तो कॉपी रायटिंग करायचा. मग त्याला सीरियलमध्ये इंटरेस्ट वाटू लागला. त्यानं एक छोटी फिल्मही बनवली. मग एक दिवस अचानक तो मामांना म्हणाला, ‘पपा, मला शेफ व्हायचंय. मामांच्या दृष्टीनं हे क्षेत्र वेगळंच होतं. शेफ म्हणजे स्वैपाकी या पलीकडे त्यांना या क्षेत्रातली काहीही माहिती नव्हती.परंतु अनिकेतने सगळं स्वत:चं स्वतः केलं. कॉलेज शोधण्यापासून अँडमिशन घेण्यापर्यंत सगळं. मामांनी फक्त पैसे दिले.
वाचा अनिकेतचा शेफ होण्याचा प्रवास Aniket Saraf Birthday
अनिकेतनं पॅरिसमधल्या कॉलेजात अँडमिशन घेतली. पॅरिसच्या त्याच्या वास्तव्यात राकेश दत्ता आणि अनिता दत्ता या जोडप्यानं अनिकेतला खूप मदत केली होती. अनिकेतला पॅरिस मध्ये ज्या कुटुंबाने मदत केली ते खरं तर सचिनच्या जवळचे होते असं मामांनी सांगितल. इथून जाताना व्हिसासाठी लोकल माणूस गॅरंटर म्हणून लागतो. व्हिसासाठी अपार्टमेंटही दाखवावं लागतं. आणि अपार्टमेंटसाठी व्हिसा. म्हणजे कोंबडी आधी की अंडं, असा प्रकार.अनिकेतचा व्हिसा करतेवेळी मामांना या गोष्टी समजल्या. दरम्यान कोर्सचे पैसे तर भरून झाले होते. तेव्हा सुप्रिया यांनी मामांना या मित्राचा रेफरेन्स दिला आणि म्हणाल्या होत्या, आमचे खूप जवळचे मित्र आहेत आणि त्यांचं पॅरिसला स्वत:चं इंडियन रेस्टॉरन्ट आहे. (Aniket Saraf Birthday)

सचिनजींनी त्यांच्या त्या पॅरिसमधल्या मित्राला सांगितलं माझ्या मुलीसाठी करशील तसं अशोकच्या मुलासाठी कर. फोनवर मामा त्यांच्याशी बोलले. त्यांनी अनिकेतच्या कॉलेजच्या जवळच अपार्टमेंट शोधून काढलं. चालत जाता येईल इतकं जवळ. फक्त ती बिल्डिंग म्हणजे जुनं मॅन्शन होतं, त्याला लिफ्ट नव्हती. नऊ मजले चढून जावे लागणार होते. गोल जिना. तिथली ती खोली अगदी छोटी. झोपण्यासाठी जेमतेम बेड मावेल आणि थोडी जागा उरेल इतकी. डब्ल्यूसी बाहेर. फक्त अंघोळ करायला आत. अनिकेत तसा थोडा लाडावलेला. इथे त्याला कधीही कोणत्याही गोष्टीसाठी ती हवी म्हटल्यावर थांबावं लागायचं नाही. तरी अनिकेत तिथे राहिला. कारण त्याला शिकण्याची पॅशन होती. त्यानं सगळी तडजोड केली. त्यामुळे तो स्वयंपूर्ण झाला. पूर्ण बदलूनच गेला. अर्थातच चांगल्यासाठी.
हे देखील वाचा : ‘लोकनाट्याला उशीर झाला तरी चालेल पण याची चांगलीच जिरवायची…’ म्हणून दादा कोंडके यांनी जिरवली होती ‘त्या’ हॉटेल वाल्याची खोड
लेकाच्या वाढदिवसा निमित्त निवेदिता यांची खास पोस्ट
पॅरिसला जायचं म्हटल्यावर तो उत्कृष्ट फ्रेंच शिकला. अस्खलित बोलायला लागला. अगदी फ्रेंच अँकसेंन्टसह. फ्रेंच क्युझिन त्यानं पॅरिसमध्ये केलं आणि नंतर पतेसरी (patisserie ), म्हणजे पेस्ट्रीज आणि केक बनवण्याचं खास शिक्षण त्यानं घेतलं लंडनमध्ये.अनिकेतनं स्वत:ची वाट स्वतः शोधली याचं मामांना खूप कौतुक आहे. (Aniket Saraf Birthday)
निवेदिता सराफ त्यांच्या सोशल मीडियावरून अनेक फॅमिली फोटो शेअर करत असतात. असाच एक फॅमिली फोटो निवेदिता सराफ यांनी आज त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहल आहे ,आजचा दिवस आमच्या साठी खास आहे, कारण आज तुझा वाढदिवस आहे.प्रिय अनिकेत, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,तू ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतोस, जे कष्ट घेतोस, तुझ्यातील संवेदनशीलता, तुझी विनोदबुद्धी या सर्व गोष्टींचा आम्हा दोघांना अभिमान आहे. तुला खूप प्रेम. तर निवेदिता ताईंच्या या पोस्ट वर अनेक कलाकारांनी देखील कमेंट करून अनिकेतवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर इट्स मज्जा कडून अनिकेतला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. (Aniket Saraf Birthday)