मनोरंजन क्षेत्रातील मालिका या प्रेक्षकांना कायमच खिळवून ठेवतात. अशातच कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेने प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना आपलस करून घेतलं. २०२० साली ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर सुरु झाली होती. या मालिकेला यंदा ३ वर्ष पूर्ण होत असून मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. एक आगळीवेगळी प्रेमकथा, कौटुंबिक संबंध व घनिष्ठ मैत्री या सगळ्याच मुद्द्यांवर आधारित ही मालिका होती. मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचं घर केलं. मालिकेत अनेक वेगवेगळी वळणे आली दरम्यान प्रेक्षकांनी या वळणांना वेळोवेळी साथ दिली.(sundara manamdhe bharali off air)
पाहा-‘सुंदरानं’ जिंकली प्रेक्षकांची मनं, मालिकाने घेतला निरोप.
मालिकेचे चित्रीकरण गावाकडचे असले तरीही उच्च विचारसरणी दाखवण्यात आली आहे. अभिमन्यू आणि लतिका या जोडीने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतलं. प्रेम असावं तर अभ्या आणि लति सारखं. त्यानंतर मालिकेत अभ्याचा मृत्यू दाखवण्यात आला. पुढे मालिकेत लतिकाने खंभीरपणा दाखवत प्रत्येक संकटाशी दोन हात केले. मालिकेची कथा पुढे जात असताना देवाची एन्ट्री झाली आणि प्रेक्षकांनी देवाच्या भूमिकेला तेवढच प्रेम दिल.मालिकेतील आदिरा ही गोड मुलगी प्रेक्षकांना खूपच आवडली. तिच्या अभिनयाने सगळेच तिच्यावर प्रेम करू लागले. सेटवर देखील तिचे लाड पुरवले जात होते. ऑनस्क्रीन दिसणारी सर्वच व्यक्तिरेखांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना आपलस केलं.
मालिकेचं शुटिंग संपल्यामुळे सर्वच कलाकार मंडळी आणि इतर टीम भावुक झालेली पाहायला मिळाली. कलाकारांचं पडद्यामागील बॉण्डिंग, सेटवर घडणारे किस्से, मज्जा मस्ती याचे अनेक व्हिडीओ ते नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामुळे त्यांचा सोशल मीडियावर चाहता वर्ग बनला आहे. आता मालिकेने प्रेक्षकांचे आभार मानत प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. सेटवर मालिकेतील शेवटचा सिन शूट केल्यानंतर सर्वच कलाकार आणि पडद्या मागे काम करणारी मंडळी भावुक झाली होती.
हे देखील वाचा: “याची जर कॉन्ट्रव्हर्सी झाली तर…” प्रियदर्शिनी इंदलकरने शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओवर ओंकार राऊतची कमेंट, म्हणाला, “मला…”
याबाबत कलाकारांनी इंस्टाग्राम वर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना लतिका , देवा , आदिरा यांना ऑनस्क्रीन पाहायला मिळणार नाही. एखाद्या सुरवातीचा शेवट हा कधी ना कधी होतोच असं म्हटलं जात, अशातच आता ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेने साऱ्यांचा निरोप घेतला आहे. असं असलं तरी सुंदरा ही कायमच प्रेक्षकांच्या मनात असणार आहे.