बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नानंतर बांदेकरांच्या लेकानं-सूनेनं थाटला वेगळा संसार; ‘तो’ फोटो पाहताच चाहत्यांच्या चर्चांना उधाण

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 15, 2025 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Pooja-Soham New Home

लग्नानंतर पूजा-सोहमचा वेगळा संसार?

Pooja-Soham New Home : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कुटुंबांपैकी एक असलेल्या बांदेकर कुटुंबात नुकताच आनंदाचा सोहळा पार पडला. अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर याने अभिनेत्री पूजा बिरारीसह लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. मात्र, लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच पूजा आणि सोहमबाबत एक नवी चर्चा रंगू लागली आहे.

लग्नानंतर पूजा-सोहम दोघेही वेगळा संसार थाटणार असल्याचं बोललं जात आहे. या चर्चांना कारण ठरला आहे त्यांनी नुकताच शेअर केलेला एक खास फोटो. या फोटोमध्ये पूजा आणि सोहम यांच्या हातात नव्या घराची चावी दिसत असून, दोघांनी मिळून स्वतःचं घर घेतल्याचं स्पष्ट होत आहे. हा फोटो शेअर होताच चाहत्यांनी त्यांना नव्या घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नवं घर, हातात चावी आणि चेहऱ्यावर आनंद या फोटोमुळे अनेकांनी अंदाज लावायला सुरुवात केली आहे की, लग्नानंतर लगेचच पूजा आणि सोहम स्वतंत्रपणे राहणार आहेत का? याच विषयावर सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

आणखी वाचा – दोन मराठमोळ्या अभिनेत्रींचा साखरपुडा, एकीने थाटामाटात तर एकीने गुपचूप उरकला सोहळा, फोटो समोर

View this post on Instagram

A post shared by Suchitra.Aadesh.Bandekar💖💝 (@dreamland.of.suchitra)

काही जण या निर्णयाचं कौतुक करत आहेत, तर काही जणांना यामागचं नेमकं कारण जाणून घ्यायची उत्सुकता लागली आहे. आजच्या पिढीतील अनेक कलाकार लग्नानंतर स्वतंत्र आयुष्याची वाट निवडताना दिसतात. तर आता पूजा आणि सोहम यांनीही आपल्या वैयक्तिक आयुष्याचा नवा अध्याय सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. मात्र, यावर अद्याप दोघांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दरम्यान, लग्नानंतर पूजा आणि सोहमचा हा नवा टप्पा त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच चर्चेचा विषय ठरत आहे. आता हे दोघं आपल्या नव्या घरात कधी प्रवेश करणार? आणि त्यांच्या संसाराची सुरुवात कशी होणार?, याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

आणखी वाचा – “मी कोणत्या मनस्थितीत आहे…” वडिलांना दोन महिने होताच प्रार्थना बेहेरे व्यक्त; म्हणाली, “हे दुःख…”

Tags: entertainment newsmarathi entertainment newsPooja-Soham New Homepooja-soham wedding
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
 Actor Anuj Sachdeva assault

रॉडने हल्ला, रक्तस्त्राव आणि…; लोकप्रिय अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला, सोसायटीतील रहिवाशाकडून मारहाण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.