Prarthana Behere Video: लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचं १४ ऑक्टोबर रोजी अपघातात मृत्यू झाला होता. वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याची दुःखद बातमी प्रार्थना बेहेरे हिने सोशल मीडियावरून दिली होती. अशातच प्रार्थनाने आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या त्यावर मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता अभिनेत्री बाबांच्या इच्छेखातर पुन्हा कामाची सुरुवात करणार आहे. सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी प्रार्थना तिच्या नव्या प्रोजेक्टची माहिती देणार आहे. अशातच आता याबद्दल प्रार्थनानं व्हिडीओ शेअर केला आहे.
वडिलांच्या आठवणीत हा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. तर हा व्हिडीओ शेअर करत प्रार्थना म्हणाली, “आजचा व्हिडीओ करतेय कारण, आज १४ तारीख आहे. आज दोन महिने झाले माझ्या बाबांना जाऊन. बाबांसाठी हा व्हिडिओ करत आहे. मला खरंतर आज काहीच सुचत नाही आहे . मी आजवर कधीच अशाप्रकारे व्यक्त झालेले नाही. मी आता कोणत्या मनस्थितीत आहे हे तुम्हाला सर्वांना समजलंच असेल. बऱ्याच जणांचे मला मॅसेजसुद्धा आले. हे दु:ख आता कायम राहणार. ते मी सांगू शकत नाही. पण, माझे बाबा नेहमी मला म्हणायचे, आयुष्यात नेहमी राहा. आनंदी राहायचा प्रयत्न कर. तू एक अभिनेत्री आहेस. सगळ्यांचं मनोरंजन करायचं हे तुझं काम आहे. कायम तू छान काम कर. ते असताना मी जे काम केलं होतं, ते काम आता बाबा नसताना तुमच्या भेटीला येणार आहे. त्यांचे आशीर्वाद असणार आहेत पण, मला तुमचेही आशीर्वाद हवे आहेत. बाबा मला नेहमी म्हणायचे, मी तुझा खूप मोठा फॅन आहे. आता बाबा तर नाही. पण, मला माहिती आहे, तुम्ही सगळे माझ्याबरोबर आहात. मी उद्या काहीतरी स्पेशल घेऊन येत आहे. जे खरंतर माझ्या बाबांसाठी आहे. तुम्हा सगळ्यांसाठी आहे. यासाठी मला तुमचा सपोर्ट, आशीर्वाद हवा आहे. बाबा असताना त्यांनी माझं हे काम आधीच पाहिलं होतं. आता बाबा नसताना हे काम प्रदर्शित होणार आहे. आता तुमचा सपोर्ट हवा आहे. तो पाठिंबा कायम ठेवा…थँक्यू सो मच” असं म्हणत प्रार्थना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तर तिच्या या व्हिडीओवर अनेक कलाकारांनी कंमेंट करत तिचं सांत्वन केलं आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने लिहिलं, हा तुझा सर्वोत्तम प्रोजेक्ट ठरेल. माझ्यावर विश्वास ठेव.. शुभेच्छा. तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने म्हटलं आहे की, ‘तुझ्या बाबांसारखे आम्ही पण तुझे fan आहोत, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुझ्या सोबत. नेटकऱ्यांनीही प्रार्थनाला तिच्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तुमचे बाबा सदैव तुमच्यासोबत आहेत. आठवणीच्या स्वरूपात त्यांचा आशीर्वाद नेहमीच असणार आहे, असं चाहत्यांनी म्हटलं.




