शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दोन मराठमोळ्या अभिनेत्रींचा साखरपुडा, एकीने थाटामाटात तर एकीने गुपचूप उरकला सोहळा, फोटो समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 15, 2025 | 10:56 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Marathi Actress Engangement

दोन मराठमोळ्या अभिनेत्रींचा साखरपुडा, एकीने थाटामाटात तर एकीने गुपचूप उरकला सोहळा, फोटो समोर

Marathi Actress Engangement : मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना पाहायला मिळाली. काहींनी लग्नाची सुखद बातमी दिली तर काहींनी साखरपुडा समारंभ उरकला. अशातच आता मराठी मालिकाविश्वातील दोन अभिनेत्रींनीं साखरपुडा समारंभ उरकत लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याची गुडन्यूज दिली. या अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार आणि रुमानी खरे. गायत्री दातार व रुमानी खरे यांनी थेट साखरपुड्याचे फोटो शेअर एंगेज असल्याचं घोषित केलं. दरम्यान, रुमानीने अगदी थाटामाटात आणि पारंपरिक अंदाजात साखरपुडा समारंभ उरकला. तर गायत्रीने फक्त साखरपुड्याची अंगठी दाखवत साखरपुडा झाल्याचं सांगितलं.

गायत्रीने साखरपुडा झाल्याची बातमी इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन दिली. गायत्रीने स्वतः ही गुड न्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली. गायत्रीने इन्स्टाग्रामवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोत ती तिच्या होणाऱ्या पतीबरोबर दिसत असून दोघेही एकमेकांकडे बघत आहेत, त्यामुळे त्यात त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तर दुसऱ्या फोटोत गायत्रीने हाताचा फोटो पोस्ट केला आहे. त्यात तिच्या बोटात अंगठी दिसत आहे.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिका होणार बंद?, जुई गडकरीने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद पण…”

View this post on Instagram

A post shared by Gaytri Pradip Datar (@gayatridatarofficial)

गायत्री दातारने हे दोन्ही फोटो एक सुंदर कॅप्शन देत शेअर केले. “माझ्या आयुष्यात हिरोची एंट्री झाली आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात बेस्ट दिवसातील काही क्षण तुमच्याबरोबर शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. ११.१२.२०२५,” असं कॅप्शन गायत्रीने या फोटोंना दिलं आहे. गायत्रीने इंगेज्ड आणि आय सेड येस, ब्राइड टू बी असे हॅशटॅग दिले आहेत. त्यावरुन गायत्री लवकरच बॉयफ्रेंडशी लग्न करणार असं दिसतंय.

आणखी वाचा – “मला गुडघेदुखीचा त्रास नव्हता पण…”, ‘आई कुठे…’ फेम कांचन आजीचा गुडघेदुखी बाबत खुलासा; म्हणाल्या… “एक वर्ष इंजेक्शन घेऊन…”

View this post on Instagram

A post shared by Stavan Shinde (@stavan_shinde)

तर सिनेविश्वातील प्रसिद्ध कवी व गीतकार संदीप खरे यांची लेक रुमानी खरेचा साखरपुडा समारंभ उरकला. रुमानीने ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. आता संदीप खरेंची लाडकी कन्या लवकरच बोहल्यावर चढणार आहे. १३ डिसेंबरला रुमानीचा साखरपुडा थाटामाटात पार पडला आहे. रुमानीने लोकप्रिय अभिनेता स्तवन शिंदेसह साखरपुडा केला आहे.

Tags: gayatri datarMarathi Actress Engangementrumani khare
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Prarthana Behere Video

"मी कोणत्या मनस्थितीत आहे…" वडिलांना दोन महिने होताच प्रार्थना बेहेरे व्यक्त; म्हणाली, "हे दुःख…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.