शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरेचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, अनुराग कश्यपबरोबर चित्रपट करणार, मोठी घोषणा

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 30, 2025 | 3:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aishwary Thackeray Bollywood debut

बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरेचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, अनुराग कश्यपबरोबरचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सक्रिय नाव म्हणजे ठाकरे…  प्रबोधन ठाकरे यांच्याकडून लोकसेवेचा व जनहिताचा वसा घेत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात सक्रिय असलेले ‘ठाकरे’ घराणे आजही राजकारणात तितकेच सक्रिय आहे. बाळासाहेबांच्याच बरोबरीने राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी राजकारणाचे धडे गिरवले आणि त्यांच्याच शिकवणीत आता अमित व आदित्य ठाकरे ही तिसरी पिढीदेखील राजकारणात आहे. पण ‘ठाकरे’ घराण्यातील एका व्यक्तीला स्क्रीनद्वारे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायचे आहे ही व्यक्ती म्हणजे स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य ठाकरे. (Aishwary Thackeray Bollywood debut)

ऐश्वर्यला राजकारणात अजिबातच रस नाही. त्यामुळे ठाकरे घराण्यातील ऐश्वर्यने राजकारणात जाण्याचा मार्ग न अवलंबता मनोरंजनाच्या क्षेत्रात आपली वेगळी वाट निवडली आहे. चित्रपट निर्माता अनुराग कश्यपबरोबर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ६९ दिवसांनंतर लखनऊमध्ये त्याच्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याचे वृत्त आहे. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, या प्रकल्पाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, अनुराग कश्यपच्या ऐश्वर्या ठाकरेबरोबरच्या चित्रपटावर अनेकदा चर्चा झाली आहे. इंडस्ट्रीतील सर्व प्रोडक्शन हाऊसमध्ये हा चित्रपट सर्वाधिक चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Aaishvary Thackeray (@aaishvarythackeray)

आणखी वाचा – “माझ्याबद्दल चुकीची माहिती देत…”, बदनामी करणाऱ्या व्यक्तीवर भडकली अमृता देशमुख, म्हणाली, “बिनडोक रेवा…”

ऐश्वर्यला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे आणि हीच आवड जोपासण्यासाठी त्याने मेहनतही घेतली आहे. ऐश्वर्यने चित्रपटांच्या सेटवर ५-५ वर्षे घालवली आहेत. त्याने सहाय्यक म्हणून काम केले आहे. २०१५ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती, मात्र त्यानंतर त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्याला चित्रपट, संगीत आणि कला यांमध्ये प्रचंड रुची आहे.

आणखी वाचा – “जर अभिनेत्रीच्या पोटाला मी चिमटा काढला असता तर…”, सुप्रसिद्ध अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, इतर कलाकारांचं नाव न घेता म्हणाला…

दरम्यान, ऐश्वर्यने स्वत:ला नेहमीच मीडियापासून दूर ठेवले आहे आणि त्याला त्याच्या राजकीय ओळखीपासून दूर राहायचे आहे. ऐश्वर्यला त्याच्या कलेने आणि मेहनतीने आपला ठसा उमटवायचा आहे आणि अभिनयाच्या जगात एक आदर्श ठेवायचा आहे. यासाठी तो मेहनत घेत आहे. त्यामुळे आता त्याच्या आगामी बॉलिवूड पदार्पणाची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.

Tags: Aishwary Thackeray Bollywood debutAishwary Thackeray Bollywood debut with Anurag KashyapBalasaheb Thackeray grandson Aishwary Thackeray
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Saif Ali Khan

दिल्लीच्या नाइट क्लबमध्येचही सैफ अली खानवर झाला होता हल्ला, चेहऱ्याचा नाश करण्याचीच दिलेली धमकी आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.