Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला सध्या चर्चेचा विषय आहे. १६ जानेवारीला थेट घरात घुसून एका अज्ञात व्यक्तीने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. यावेळी, चाकूचा एक तुकडा अभिनेत्याच्या पाठीच्या कण्यामध्ये अडकला होता. नंतर अभिनेत्याची आपत्कालीन शस्त्रक्रिया केली गेली. रुग्णालयात पाच दिवस राहिल्यानंतर अखेर तो घरी परतला आहे. यापूर्वीही अभिनेत्याला एका हल्ल्याला सामोरे जावे लागले होते. दिल्लीच्या नाईट क्लबमध्ये सैफवरही हल्ला झाला. अभिनेत्याचा थ्रो बॅक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो दिल्लीतील नाईटक्लब दरम्यानच्या भांडणाविषयी सांगत आहे.
अभिनेता सैफ अली खानचा एक जुना व्हिडीओ पुन्हा इंटरनेटवर आला आहे, ज्यामध्ये तो १९९४ मध्ये दिल्लीतील नाईटक्लबमध्ये त्याच्यावर हल्ला झाल्याचे सांगताना दिसत आहे. सैफ इन्स्टाग्रामवर ‘लेहरे टीव्ही’ यांच्या व्हिडीओमध्ये बोलताना दिसतोय, “दिल्लीतील ‘मैं खिलाड़ी तू अनाड़ी’ चित्रपटाच्या प्रीमियरनंतर मी माझ्या मित्राबरोबर नाईटक्लबमध्ये गेलो. आम्हाला काही मुलींनी त्यांच्याबरोबर नाचण्यास प्रवृत्त केले, मात्र असे करण्यास आम्ही सहमत नव्हते, तेव्हा मी त्यांना सांगितले की आम्हाला सोडा. त्यांचे प्रियकर तिथेही उपस्थित होते, म्हणून आम्ही त्यांना सांगितले की, कृपया त्यांची काळजी घ्या. आमचं हे बोलणं त्यांना आवडलं नाही.
आणखी वाचा – सलमान खानच्या मानलेल्या बहिणीचा मोठा अपघात, रुग्णालयात उपचार सुरु, ओळखणंही झालं कठीण
त्यावेळी त्यापैकी एकाने सांगितले की, “तुमच्याकडे दहा लाख डॉलर्सचा चेहरा आहे, त्याचा मी नाश करेन. मग त्याने माझ्या डोक्यावर मारले”. यावर सैफने या घटनेबद्दल तक्रार का केली नाही असे विचारले तेव्हा त्याने उत्तर दिले की, “त्या वेळी मला त्या प्रकरणात कोणतीही प्रसिद्धी द्यायची नव्हती. परंतु जर लोक लिहित असतील की मी ती लढाई सुरु केली तर त्या रात्री जे घडले ते मी स्पष्टपणे लोकांना समजावून सांगू शकतो”.
आणखी वाचा – “माझ्याबद्दल चुकीची माहिती देत…”, बदनामी करणाऱ्या व्यक्तीवर भडकली अमृता देशमुख, म्हणाली, “बिनडोक रेवा…”
सैफ अली खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर अखेर तो २०१४ मध्ये ‘देवरा भाग १’ मध्ये दिसला होता. या . चित्रपटात त्याने खलनायक भैरवची भूमिका साकारली होती. या पॅन इंडियाच्या रिलीझने भारतात २०० कोटी रुपये कमावले आणि जगभरात ४२० कोटी रुपये कमावले.