कलाकार म्हटलं की, चाहत्यांचे कौतुक, प्रेम हे आलंच. पण अनेकदा या कलाकारांना सोशल मीडियावरील ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. सोशल मीडियाच्या अधिकच्या वापरामुळे कलाकारांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. आपल्या आवडत्या कलाकारांवरील प्रेमाबद्दल अनेक चाहते मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. ट्रोलर्स कलाकारांची बदनामी करतानाची अनेक उदाहरणे पाहायला मिळाली आहेत. काही कलाकार सोशल मीडियावरील या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात. पण काही कलाकार मात्र या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देतात. ट्रोलर्सना न जुमानता त्यांना सडेतोड उत्तर देणारे अनेक मराठी कलाकार आहेत. यात आता अमृता देशमुखचीही भर पडली आहे. (Amruta Deshmukh on troller)
अभिनेत्री अमृता देशमुखने नुकतंच एका ट्रोलर्सला धारेवर धरलं आहे. अमृता ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे व प्रसादबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर अभिनेत्रीचे युट्यूब चॅनेलदेखील आहे. यावरील काही गंमती-जंमतीही ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अमृता सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तिच्या चाहत्यांकडूनदेखील तितकंच प्रेम मिळतं. मात्र नुकतंच एका सोशल मीडिया वापरकर्त्याने अमृताबद्दल चुकीची माहिती पसरवली आहे आणि याबद्दल तिने सोशल मीडियावर तक्रार केली आहे.

आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : रंग प्रेमाचा! अखेर एजेंनी लीलाला दिली प्रेमाची कबुली, नात्यात नवी सुरुवात
अमृताने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. ‘बिनडोक रेवा’ असं म्हणत तिने तिची बदनामी करणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख केला आहे आणि पुढे असं म्हटलं आहे की, “जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल किंवा माझ्यावर थोडेसे जरी प्रेम असेल तर या व्यक्तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला रिपोर्ट करा. ही/हा माझ्या आणि माझ्या जवळच्या लोकांबद्दल चुकीची माहिती आणि द्वेष पसरवत आहे”.
दरम्यान, अनेक मालिकांमधून दिसणारी अमृता देशमुख सध्या तिच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. अमृता देशमुख सध्या संकर्षण कऱ्हाडेबरोबर ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. सध्या या नाटकाचे जोरदार प्रयोग महाराष्ट्रभर सुरु आहेत. हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.