महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सक्रिय नाव म्हणजे ठाकरे… प्रबोधन ठाकरे यांच्याकडून लोकसेवेचा व जनहिताचा वसा घेत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात सक्रिय असलेले ‘ठाकरे’ घराणे आजही राजकारणात तितकेच सक्रिय आहे. बाळासाहेबांच्याच बरोबरीने राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी राजकारणाचे धडे गिरवले आणि त्यांच्याच शिकवणीत आता अमित व आदित्य ठाकरे ही तिसरी पिढीदेखील राजकारणात आहे. पण ‘ठाकरे’ घराण्यातील एका व्यक्तीला स्क्रीनद्वारे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायचे आहे ही व्यक्ती म्हणजे स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य ठाकरे. (Aishwary Thackeray Bollywood debut)
ऐश्वर्यला राजकारणात अजिबातच रस नाही. त्यामुळे ठाकरे घराण्यातील ऐश्वर्यने राजकारणात जाण्याचा मार्ग न अवलंबता मनोरंजनाच्या क्षेत्रात आपली वेगळी वाट निवडली आहे. चित्रपट निर्माता अनुराग कश्यपबरोबर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ६९ दिवसांनंतर लखनऊमध्ये त्याच्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याचे वृत्त आहे. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, या प्रकल्पाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, अनुराग कश्यपच्या ऐश्वर्या ठाकरेबरोबरच्या चित्रपटावर अनेकदा चर्चा झाली आहे. इंडस्ट्रीतील सर्व प्रोडक्शन हाऊसमध्ये हा चित्रपट सर्वाधिक चर्चेत आहे.
आणखी वाचा – “माझ्याबद्दल चुकीची माहिती देत…”, बदनामी करणाऱ्या व्यक्तीवर भडकली अमृता देशमुख, म्हणाली, “बिनडोक रेवा…”
ऐश्वर्यला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे आणि हीच आवड जोपासण्यासाठी त्याने मेहनतही घेतली आहे. ऐश्वर्यने चित्रपटांच्या सेटवर ५-५ वर्षे घालवली आहेत. त्याने सहाय्यक म्हणून काम केले आहे. २०१५ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती, मात्र त्यानंतर त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्याला चित्रपट, संगीत आणि कला यांमध्ये प्रचंड रुची आहे.
दरम्यान, ऐश्वर्यने स्वत:ला नेहमीच मीडियापासून दूर ठेवले आहे आणि त्याला त्याच्या राजकीय ओळखीपासून दूर राहायचे आहे. ऐश्वर्यला त्याच्या कलेने आणि मेहनतीने आपला ठसा उमटवायचा आहे आणि अभिनयाच्या जगात एक आदर्श ठेवायचा आहे. यासाठी तो मेहनत घेत आहे. त्यामुळे आता त्याच्या आगामी बॉलिवूड पदार्पणाची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.