एकीकडे बॉलीवूड व हॉलिवूडच्या चित्रपटांना प्रतिसाद मिळत असताना महिनाभरापूर्वी प्रदर्शित झालेला केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आधीपासूनच धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाला राज्यासह जगभरातील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून चित्रपटाला मिळालेल्या या अफाट यशाने दिग्दर्शक केदार शिंदे भारावले. यानिमित्ताने दिग्दर्शक केदार शिंदे चित्रपटातील अन्य कलाकारांसह देवदर्शनाला गेले आहेत. (kedar shinde went to devdarshan with team baipan bhari deva)
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची टीम सध्या विविध मंदिरांचे दर्शन घेत असून नुकतंच चित्रपटाच्या टीमने कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचे दर्शन घेतले आहे. त्याचे फोटोज त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. ज्यात केदार यांच्यासोबत अभिनेत्री सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर व निर्माते निखिल साने दिसत आहेत.
केदार शिंदे व बाईपणच्या कलाकारांनी घेतले कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन (kedar shinde went to devdarshan with team baipan bhari deva)
आज कोल्हापुरात श्री महालक्ष्मी मंदिरात "देवी"चं दर्शन घेतलं. #बाईपणभारीदेवा pic.twitter.com/y04X7vo4FF
— 🄺🄴🄳🄰🅁 🅂🄷🄸🄽🄳🄴 (@mekedarshinde) July 26, 2023
केदार यांनी हे फोटोज त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले असून ज्यात त्यांनी लिहिलंय, ‘आज कोल्हापुरात श्री महालक्ष्मी मंदिरात “देवी”चं दर्शन घेतलं’. तर दुसऱ्या एका फोटोला त्यांनी “अंबाबाईच्या नावानं चांगभलं” असं कॅप्शन दिलेलं आहे. केदार यांनी याआधी सिद्धिविनायक मंदिर, एकविरा देवी, श्री स्वामी समर्थ मठ आदी मंदिरांना भेट दिलेली आहेत. शिवाय ते देवदर्शनाबरोबरच चित्रपटाचे प्रमोशनदेखील करत आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट महिलांचे भावविश्व व त्यांची स्वतःला ओळखण्याची जिद्द यांवर आधारित आहे. मराठीतील सहा उत्कृष्ट अभिनेत्रींच्या दमदार अभिनयाने नटलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत ६५ कोटींहून अधिक कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडताना दिसत आहेत. त्यामुळे लवकरच सैराट, वेड यांसारख्या चित्रपटांचा रेकॉर्ड ‘बाईपण भारी देवा’ मोडणार, असं चित्र सध्या बॉक्स ऑफिसवर दिसतंय. (baipan bhari deva)
हे देखील वाचा : चहाही न बनवता येणाऱ्या सुकन्या मोने कशा झाल्या सुगरण?, म्हणाल्या, “माहेरी असताना…”