Thipkyanchi Rangoli New Episode: प्रेक्षकांच्या निखळ मनोरंजनात ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचा मोलाचा वाटा आहे.सासू-सुनेची रोजची भांडण न दाखवता एकत्र कुटुंबाची मज्जा धमाल, काहींकवेळेला होणाऱ्या कुरघोडी या सगळ्यातून उत्तम मनोरंजन प्रेक्षकांचं होतं आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं आहे. अप्पूचा अल्लडपणा, व शशांकचा समजूतदारपणा यांमुळे ही जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. (Thipkyanchi Rangoli New Episode)
अपूर्वा, शशांकच्या नात्याने पुन्हा नव्याने सुरुवात केली. अपूर्वाचा नवीन लुकदेखील मालिकेत पाहायला मिळाला. त्यानंतर अपूर्वा शशांकच नातं सध्या नवीन वळणावर आहे. लग्नानंतर अपूर्वाने मुलं न होऊ देण्याचा निर्णय घेतला होता. अपूर्वाची आईला देखील हेच हवे होते.
पाहा काय घडणार येत्या भागात? (Thipkyanchi Rangoli New Episode
सध्या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. अपूर्वा व शशांक आई-बाबा होणार आहेत. तेव्हा अपूर्वाची आई कानेटकर कुटुंबासोबत वाद घालते. अपूर्वाच्या आईचं असं म्हणणं आहे की, अपूर्वाला हे मुलं नको आहे, तुम्ही बळजबरी करून तिला मुलाच्या जबाबदारीत अडकवू नका. त्यावर शशांकची आई स्पष्टपणेच उत्तर देते, अपूर्वाला विचारा तिला काय हवं आहे? त्यावेळी अपूर्वा उत्तर देते, कि मला हे बाळ हवं आहे आणि अपूर्वाच्या या निर्णयाने संपूर्ण कानेटकर कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. (Thipkyanchi Rangoli New Episode)

हे देखील वाचा: मीरा जगन्नाथनंतर आणखी एका कलाकाराचा ‘ठरलं तर मग’ मालिकेला रामराम, नव्या अभिनेत्याची एण्ट्री
शशांक-अपूर्वा ही नवीन जबाबदारी कशी पेलणार? त्यांच्या या नवीन प्रवासात कोणते अडथळे येणार आणि अपूर्वा-शशांकचा हा नवीन प्रवास कसं असणार हे बघणं रंजक ठरणार आहे.