गायक, रॅपर म्हणून प्रसिद्ध असणारे दोन चेहरे म्हणजे हनी सिंग व बादशाह. बऱ्याच कालावधीपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत. या बाबत दोघांनी ही एकमेकांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आरोप केले आहेत. पुन्हा एकदा ही गायक जोडी चर्चेत आल्याचं दिसतंय. बादशाहच्या एका गाण्याच्या कॉन्सर्टमध्ये हनी सिंगच्या काही चाहत्यांनी मोठ्याने हनी सिंगच्या नावाने घोषणा देत धुमाकूळ घातला. यावर बादशाहने देखील त्याच्या अंदाजात हनी सिंगच्या चाहत्यांची बोलती बंद केली. (Badshah Honey Singh Controversy)
बादशाह स्टेजवर गात असताना अचानक चाहत्यांमधील काहींनी हनी सिंगच्या नावाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली यावर बादशाहने “एक पेन और पेपर देना। गिफ्ट लाया हूं तुम्हारे लिए। कुछ लिरिक्स लिख के देता हूं। पापा का कमबैक हो जाएगा तुम्हारे। यही काम रह गया है तुम्हारा और तो पल्ले है नहीं कुछ।” बादशाहने या गाण्याच्या कॉन्सर्टमध्ये “एक कागद आणि पेन घेऊन या तुमच्यासाठी खास गिफ्ट आहे. गाण्याच्या काही ओळी तुम्हाला लिहून देतो. एवढंच काम आता तुमच्याकडे उरलंय” या शब्दात अप्रत्यक्षपणे हनी सिंगवर टीका केल्याच्या चर्चा सर्वत्र पसरल्या आहेत. बादशाहाचा हा व्हिडीओ देखील सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसतोय.
जियान भाई ने थोड़ा भी संकोच नहीं किया ????????pic.twitter.com/0bBBTa8FLt
— Byomkesh (@byomkesbakshy) March 17, 2024
बादशाहने बॉलीवूड मधील अनेक चित्रपटांमध्ये आपल्या हटके अंदाजात गाण्यांनी मोठा चाहतावर्ग जमवला आहे. तर हनी सिंग हे नाव देखील बॉलीवूडजगतात मागील अनेक वर्षांपासून गाजतंय. मध्यंतरीच्या काळात गंभीर आजारामुळे हनी सिंगने गायनातून काही काळ ब्रेक घेल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं तर आता हनी सिंग पुन्हा एकदा आपल्या नवीन गाण्यासह कधी कमबॅक करणारा हे पाहण्यासाठी त्याच्या चाहतावर्ग कमालीचा उत्सुक दिसत आहे. (Badshah Honey Singh Controversy)
बादशहचया कार्यक्रमात जय प्रकारे हनी सिंगच्या चाहत्यांनी धुमाकूळ घातला त्याचप्रमाणे हनी सिंगच्या एखाद्या कार्यक्रमात देखील हा चाहतावर्ग पुन्हा एकदा भिडताना दिसू शकतो. हनी सिंगच्या कमबॅकसह बादशाहच देखील नक्की कोणतं नवीन गाणं येणार याची देखील प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असल्याचं पाहायला मिळतंय.