रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लग्नाच्या ३३ वर्षांनंतरही तो…”, आदेश बांदेकरांचा खरा स्वभाव कसा?, घरातील वागणूकीबाबत बायकोचं भाष्य, सुचित्रा म्हणाल्या, “स्वामींच्या कृपेने…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 19, 2024 | 11:40 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Suchitra Bandekar On Aadesh Bandekar

"लग्नाच्या ३३ वर्षांनंतरही तो…", आदेश बांदेकरांचा खरा स्वभाव कसा?, घरातील वागणूकीबाबत बायकोचं भाष्य, सुचित्रा म्हणाल्या, "स्वामींच्या कृपेने…"

मराठी मनोरंजन विश्वातील क्युट कपलपैकी एक कपल म्हणजे अभिनेत्री सुचित्रा बांदेकर व अभिनेते आदेश बांदेकर. लोकप्रिय जोडींच्या यादीत या जोडीचं नाव आवर्जून घेतलं जातं. गेली ३३ वर्षे या जोडीचा सुखाचा संसार सुरु असलेला पाहायला मिळत आहे. एकत्र कुटुंबरोबरचे अनेक फोटो ते शेअर करत असतात. शूटिंगच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत ते कुटुंबाला, एकमेकांना वेळही देताना दिसतात. आदेश बांदेकर यांना तर ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे लोकप्रियता मिळाली आहे. नुकतीच सुचित्रा बांदेकर यांनी सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी सुचित्रा यांनी आदेश यांच्या स्वभावाबाबत बरंच भाष्य केलं. (Suchitra Bandekar On Aadesh Bandekar)

आदेश यांच्या स्वभावाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. पुढचा-मागचा कसलाही विचार न करता लग्न केलं. त्याच्यामुळे सर्व जबाबदारी अंगावर आली आणि गरजेपोटी मी काम करायला सुरुवात केली. आदेशच्या घरुनही मला पाठिंबा होता. माझे बाबा आता या जगात नाहीत. त्यांना अल्झायमर हा आजार झाला होता. पण कोणाला खरं वाटणार नाही तर शेवट्पर्यंत त्यांना फक्त आदेशचं नाव लक्षात होतं. तेव्हा ते मला नेहमी म्हणायचे की, मी शोधूनही तुला इतका चांगला नवरा भेटला नसता. आदेश खरा आहे. धमाल आहे. राम आहे. तो प्रत्येक प्रसंगाला समोर जाऊ शकतो. आणि त्यातून तो मार्ग काढू शकतो ही त्याची कला आहे”.

आणखी वाचा – ‘या’ हिंदू अभिनेत्रीने लग्नानंतर बदलला धर्म, रमजानमध्ये उपवास करण्यावरुन ट्रोल, नेटकरी म्हणाले, “नवरात्रीतही…”

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

पुढे त्या म्हणाल्या, “आदेशबरोबर जाऊन लोक बोलू शकतात, जे माझ्याबरोबर शक्यतो घडत नाही. आणि हेच त्याच्या ‘होम मिनिस्टर’चं गणित आहे. एक सामान्य गृहिणी जेव्हा त्याच्याबरोबर तिच्या मनातील बोलू शकते ही खूप मोठी गोष्ट आहे. समोरच्याचा मनात काय सुरु आहे, त्याला न दुखावता त्याच्या मनाला सांभाळून तो सर्व परिस्थिती हाताळतो. यासाठी त्याला कोणत्याही ओळखीची गरज नाही. मदत करणे हे त्याच्या डीएनएमध्ये आहे. गरज असताना आदेश बांदेकर पुढे असणार ही त्याची कला आहे. आणि म्हणून मला वाटत की, देवही त्याला नेहमी साथ देतो. तो ज्या गोष्टी करतो त्या सफल होतात कारण त्यामागचा त्याचा हेतू चांगला असतो”.

आणखी वाचा – “सासू माँ…”, सासू-सासऱ्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रथमेश लघाटेच्या हटके शुभेच्छा, एकत्रित फोटो शेअर करत म्हणाला…

यापुढे त्या म्हणाल्या, “शुटिंगनिमित्त प्रवास करुनही त्याची एनर्जी अफलातून आहे. इतका प्रवास करुन घरी आल्यावर स्वामींच्या कृपेने तो माणूस नेहमीच फ्रेश असतो. माझ्या मनात काय सुरु आहे वा सोहमच्या मनात काय सुरु आहे हे तो कुठेही बसून सांगू शकतो. त्याला एका हॅलोमध्ये सर्वकाही कळतं. आमच्या लग्नाला 33 वर्ष झाली आहेत तरीही तो अजूनही माझं तेवढंच मन जपतो”.

Tags: bandekar familyentertainmentmarathi actresssuchitra bandekar husbandSuchitra Bandekar On Aadesh Bandekar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Mukesh Khanna on Ranveer singh

'शक्तीमान' रणवीर सिंह साकारणार म्हंटल्यावर नको नको ते बोलले, न्यूड सीनवरुनही हिणावलं, आता मुकेश खन्नांनी डिलीट केला व्हिडीओ कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.